आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचयापचय गतिमान करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे चालणे. ताशी ८ किमी किंवा त्याहून अधिक वेगाने चालल्याने अनेक गंभीर आजारांचा धोका कमी होतो. विशेष म्हणजे १० मिनिटांच्या चालण्याचाही शरीराला फायदा होतो. दररोज ६० मिनिटे चालण्याचे शरीराला वेगवेगळे फायदे होतात.
१० मिनिटे चालणे : साखर नियंत्रित होते
नियमित १० मिनिटांच्या चालण्यामुळे फास्टिंग आणि पोस्ट मील ब्लड ग्लुकोज सुधारते. रात्रीच्या जेवणानंतर ते जास्त फायदेशीर आहे. टाइप-२ मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी दररोज किमान ५००० पावले चालणे आवश्यक आहे. यामध्ये ३००० स्टेप्स ब्रिस्क वॉक म्हणजे गाणे गाता न येण्याएवढ्या वेगाने.
२० मि. चालणे : वृद्धत्व प्रक्रिया मंदावते
दिवसातून २० मिनिटे वेगवान चालण्यामुळे मायटोकाँड्रियाच्या कार्यामध्ये तीव्र सुधारणा होते. मायटोकाँड्रिया शरीर आणि विविध अवयवांना ९०% ऊर्जा प्रदान करते. यामुळे वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावते. रक्तदाब, कोलेस्टेरॉल व मधुमेह या हृदयाला हानिकारक घटकांत सुधारणा होते.
३० मि. चालणे : प्रतिकारशक्ती वाढते
शरीराचे संरक्षण करणाऱ्या बी-सेल्स, टी-सेल्स आणि किलर सेल्सची सक्रियता वाढते. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. चालताना आकुंचन आणि प्रसरण पावणारे स्नायू पायांमधील नसांवर दबाव टाकतात, त्यामुळे वेगवेगळ्या अवयवांमध्ये रक्तप्रवाह वाहू लागतो.
४० मि. चालणे : तणाव कमी होतो
३ मैल प्रतितास या वेगाने ४० मिनिटे चालणे आपल्या शरीरातील तणाव संप्रेरक कार्टिसोलची पातळी कमी करतेच, पण मेलाटोनिनसारख्या स्लीप हार्मोन्सची पातळीदेखील वाढवते. यामुळे चांगली झोप येते. तणाव कमी होतो. याशिवाय स्नायूही मजबूत होतात.
५० मि. चालणे : वजन वेगाने घटते
४ मैल प्रतितास वेगाने चालल्यास ८० किलो वजनाची एखादी व्यक्ती ५० मिनिटांमध्ये सुमारे ३५०-४०० कॅलरीज बर्न करू शकते. आपण दररोज ५०० कॅलरीज जास्त जाळल्या आणि आहार नियंत्रणात ठेवला तर महिन्याभरात १.५ किलोपर्यंत वजन कमी करता येते.
६० मि. चालणे : सरासरी आयुर्मान वाढते
दररोज ६० मिनिटे चालण्याने मेंदू आणि मज्जातंतू दोन्ही शांत होऊन छोटे-छोटे विचार करण्याची क्षमता वाढते. हे व्यक्तीला रणनीतिकदृष्ट्या समृद्ध करते, त्यामुळे सर्जनशीलता वाढते. ६० मिनिटांच्या चालण्याने शरीराच्या जवळजवळ सर्व भागांना फायदा होतो, त्यामुळे सरासरी आयुर्मान वाढते.
१० मैल
आठवड्याला चालण्याने सरासरी व्यक्ती २२६ किलो कार्बन डाय ऑक्साइडचे उत्सर्जन थांबवते.
४२९७ पावले एक भारतीय दिवसाला सरासरी चालतो, हे ४९६१ या जागतिक सरासरीपेक्षा कमी आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.