आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआयुष्यात तुम्हाला दीर्घायुषी होण्याचा आशीर्वाद मिळाला असेल. पण दीर्घ काळ कसे जगता येते? तज्ज्ञांच्या मते १०० वर्षे जगणे शक्य आहे. फक्त तुम्हाला जेवण चांगले घ्यावे लागेल.
युनिव्हर्सिटी ऑफ विस्कॉन्सिनचे प्रा. रोजलिन अँडरसन आणि यूएससी लिओनार्ड डेव्हिस स्कूलचे प्रा. वाल्टर लोन्गो यांनी गेल्या दशकात पोषणावर झालेल्या शेकडो संशोधनांचा अभ्यास केला. त्याचा निष्कर्ष अलीकडेच प्रकाशित झाला आहे. दीर्घ काळ जगता येऊ शकेल असे जेवण संशोधकांनी शोधले आहे. त्यांच्या मते, वनस्पती आधारित कार्बोहायड्रेट असलेले जेवण वाढवून आणि प्रोसेस्ड फूड कमी करून दीर्घ काळ जगता येऊ शकते. अँडरसन यांच्या मते, उपवास आणि इतर जेवणाचा संबंध वजन कमी करण्याशी जोडला जातो, पण ते दीर्घायुष्यासाठीही महत्त्वाचे आहे. महत्त्वाचे म्हणजे संशोधकांनी दीर्घायुष्यासाठी डार्क चॉकलेटही महत्त्वाचे मानले आहे. त्यांच्या मते, रोज तुमची ३०% कॅलरी काजू, ऑलिव्ह तेल आणि डार्क चॉकलेट यातून यायला हवी.
ते असाही सल्ला देतात की लाल मांस आणि प्रक्रियायुक्त मांसासह रिफाइंड धान्य आणि अॅडेड शुगर टाळणेच उत्तम. प्रक्रियायुक्त अन्नाऐवजी वनस्पती आधारित जेवण केल्याने आयुष्याची १० वर्षे वाढतात. प्रोटीनचे सेवन मर्यादित केल्याने आयुष्य वाढू शकते. अनेक प्रकारचे प्रोटीन आणि अॅमिनो अॅसिडमुळे हार्मोनचे प्रमाण वाढते आणि शरीराची जैविक प्रक्रिया वेगवान होते. त्यामुळे शरीर लवकर जर्जर होते. संशोधक अधूनमधून तसेच एकापेक्षा जास्त दिवस उपवासाचा सल्लाही देतात. त्यांच्या मते, रोज ११ ते १२ तासांच्या अंतराने खाणे आणि उर्वरित १२ तास उपवास करणे चांगले असते. दर ३ ते ४ महिन्यांत एकापेक्षा जास्त दिवस उपवास करणेही फायदेशीर ठरते.
असे असावे आदर्श जेवण... वृद्धत्व लवकर येणार नाही
कच्ची कर्बोदके : गहू, ब्रेड, ब्राउन राइस, पास्ता, मसूर डाळ, राजमा, जव, ओट्स.
प्रोटीन : डाळी, चणे, राजमा.
वनस्पती आधारित चरबी : ऑलिव्ह ऑइल, सुका मेवा, डार्क चॉकलेट, नारळ, अॅव्होकॅडो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.