आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Lifestyle
  • Health
  • If The Virus Infection Is Eliminated In Humans, The Risk Of Second Wave Of Corona From Animals, The Number Of Viruses May Be Higher

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संशोधकांचा इशारा:पाळीव प्राण्यांमध्ये पसरू शकतो कोरोना व्हायरस; माणसांमध्ये नियंत्रणात आल्यानंतरही प्राण्यांपासून होऊ शकतो फैलाव

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • माणसांतून प्राण्यात आणि प्राण्यांपासून पुन्हा माणसांत कोरोना पसरण्याचा धोका

कोरोना व्हायरसच्या फैलावाची दुसरी लाट प्राण्यांमुळे येऊ शकते असा दावा एका संशोधनात करण्यात आला आहे. माणसांमध्ये या व्हायरसच्या फैलावावर नियंत्रण मिळवण्यासाठी सध्या जगभरात प्रयत्न सुरू आहेत. परंतु, युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या संशोधनानुसार, माणसांमध्ये हा व्हायरस नियंत्रणात आला तरीही जनावरांमधून त्याचा फैलाव होऊ शकतो. अर्थातच माणसांतून जनावरांमध्ये आणि जनावरांमधून पुन्हा माणसांमध्ये हा व्हायरस पसरू शकतो. हीच कोरोनाची दुसरी लाट ठरू शकते. लेंसेट जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या रिपोर्टनुसार, जगभरातील जनावरांवर आणि सुद्धा लक्ष ठेवण्याची गरज आहे.

प्राण्यांतून माणसांत आणि माणसांपासून प्राण्यांत संक्रमणाचे पुरावे

संशोधक प्राध्यापक जॉन सेंटिनी यांनी सांगितल्याप्रमाणे, जनावरांमधून माणसांमध्ये आणि माणसांतून जनावरांमध्ये हा व्हायरस पसरू शकतो. सोबतच, पुन्हा जनावरांमधून माणसांत याचा फैलाव सुद्धा नकारता येणार नाही. तरीही या धोक्याचे प्रमाण नेमके किती आहे यावर सध्या संशोधन सुरू आहेत. प्राध्यापक सेंटिनी यांच्या मते, जनावरांपासून पुन्हा फैलाव रोखण्यासाठी आपल्याला एक व्यूहरचना आखण्याची गरज आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, चीनमध्ये कोव्हिड-19 व्हायरसचा पहिला प्रसार झाला. हा व्हायरस वटवाघळांतून इतर जनावरांमध्ये आणि त्यानंतर माणसांमध्ये पसरला होता.

अनेक प्रकारच्या जनावरांमध्ये फैलावाचा धोका

प्राध्यापक सेंटिनी यांनी सांगितल्याप्रमाणे, जनावरांमध्ये सुद्धा व्हायरसच्या फैलावाचा स्फोट होण्याची भीती आहे. असे झाल्यास 2002 च्या महामारीच्या तुलनेत या महामारीत संक्रमण खूप अधिक होईल. कोरोनाचे मॉडेल आणि लॅबमध्ये टेस्टिंगमधून हे स्पष्ट होत आहे की अनेक प्रकारच्या जनावरांमधून हा व्हायरस पसरू शकतो. एकदा जनावरांमध्ये हा व्हायरस पोहोचल्यास तो एका प्रजातीतून दुसऱ्या प्रजातीत पसरेल आणि ते रोखणे अतिशय कठिण होईल.

जनावरांमध्ये पसरल्याची काही चर्चित प्रकरणे

  • 5 मार्च रोजी हाँगकाँगगमध्ये दोन पाळीव श्वानांमधून माणसांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. परंतु, जनावरांमध्ये व्हायरसशी लढण्यासाठी खास अँटिपबॉडी आहे. या प्राण्यांमध्ये कोरोनाचा फैलाव त्यांच्याच जवळपास राहणाऱ्या माणसांतून पोहोचला होता. हा दावा हाँगकाँग आणि ऑस्ट्रेलियाच्या संशोधकांनी केला होता.
  • 5 एप्रिल रोजी न्यूयॉर्क सिटीच्या ब्राँक्स प्राणी संग्रहालयात 4 वर्षांच्या वाघिणीला कोरोनाची लागण झाली होती. 22 एप्रिल रोजी त्याचा फैलाव होऊन 4 वाघघ आणि 3 सिंहांना त्याची लागण झाली.
  • 22 एप्रिल रोजी न्यूयॉर्कच्या दोन पाळीव मांजरींना कोरोनाची लागण झाली होती. सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (सीडीसी) च्या माहितीप्रमाणे त्या मांजरींना श्वास घेण्यात त्रास झाला होता.
  • नुकतेच नेदलँड्समध्ये मिंक या प्राण्यातून माणसाला कोरोनाची लागण झाली होती. कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात मिक पाळल्या जातात. त्या ठिकाणी या प्राण्यांच्या स्किन आणि केसांचा व्यापार होतो.
बातम्या आणखी आहेत...