आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी नॉलेज सिरिज:आरटीपीसीआर निगेटिव्ह असूनही लक्षणे असतील, तर सहा दिवसांनी सीटी स्कॅन करा, प्रारंभी फुप्फुसांत संसर्ग दिसत नाही

10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लक्षणे असतील, बाधिताशी संपर्क आला तर स्वत: रुग्ण आहात असे समजा

कोरोनाची अनेक नवी लक्षणे दिसत आहेत. लोकांच्या मनात याबद्दल भीती आणि संभ्रम आहे. कोरोना चाचणी केली तरी माहिती मिळत नाही. या विषयावर दै. भास्करचे पवन कुमार यांनी संवाद साधला. जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला...

कोरोनाची लक्षणे काय आहेत?
इतर विषाणुजन्य आजारासारखीच लक्षणे असतात. सर्दी, खोकला, पडसे, डोकेदुखी, अंगदुखी.

अगोदर डोकेदुखी, पायदुखी ही लक्षणे नव्हती. आता डायरिया, कंजक्टिव्हायटिस पण लक्षणे आहेत. नवी लक्षणे ही सामान्य बाब आहे?
विषाणुजन्य आजारात ही लक्षणे असतात. नाक, तोंड, डोळ्यांतून संसर्गाचा धोका असतो. विषाणू जसजसे बदल करून घेतो तशी लक्षणे बदलतात.

मला एखादे लक्षण आहे, ते कोरोनाचेच आहे पण लक्षात येत नाही, असे होऊ शकते?
शक्य आहे. कारण, हा आजार दीड वर्षापूर्वीचा आहे. हळूहळू याबद्दलची माहिती कळेल. त्या-त्या परिस्थितीत या आजाराची लक्षणे निश्चित होतील.

लक्षणे नसलेल्यांना हे कसे कळू शकेल?
हे कळणे खूप कठीण आहे. म्हणूनच सातत्याने मास्कचा वापर करा, कोविड प्रोटोकॉलचे काटेकोर पालन करा म्हणून सांगितले जात आहे.

आता चाचण्यांसाठीही रांगा आहेत. काय करावे?
लक्षणे असतील, कोरोना रुग्णाशी संपर्क आला असेल तर स्वत:ला कोरोना रुग्ण मानून तसेच वागा. स्वत:ला वेगळे ठेवा. डॉक्टरांशी संपर्क साधा.

कोणती लक्षणे गंभीर संसर्गाची मानावीत?
साधी सर्दी-ताप, अंगदुखी ही आजाराची साधी लक्षणे आहेत. मात्र, जर ताप सात दिवसांहून अधिक काळ राहिला, खोकलाही कमी होत नसेल आणि श्वास घेण्यास त्रास होत असेल तर आजार गंभीर आहे लक्षात घेतले पाहिजे.

किरकोळ लक्षणांतून आजार कमी पसरतो?
असे नाही. जो कुणी अशा व्यक्तीमुळे बाधित होईल त्याला साधीच लक्षणे असतील असे नाही. एसिम्प्टोमॅटिक रुग्णाला खोकला किंवा सर्दी कमी असते. त्यामुळे त्याच्यामार्फत संसर्ग अधिक होतो.

आरटी-पीसीआर निगेटिव्ह तरी फुप्फुसांत संसर्ग आढळत आहे. चाचणीची विश्वासार्हता किती?
सध्या आरटी-पीसीआर सर्वात प्रभावी चाचणी आहे. समजा दुसऱ्यांदा आरटी-पीसीआर अहवाल निगेटिव्ह आला आणि लक्षणे असतील तर ६ दिवसांनंतर छातीचा सीटी स्कॅन करून संसर्ग कळू शकतो. सुरुवातीला सीटी स्कॅनचा फायदा नाही. कारण तेव्हा संसर्ग फुप्फुसांत दिसतच नाही.

डॉ. नीरज निश्चल
एम्स, नवी दिल्लीचे मेडिसिन विभागाचे सहप्राध्यापक

बातम्या आणखी आहेत...