वर्क फ्रॉम होम करत असाल तर...

  • जर तुम्ही घरात बसून ऑफिसचे काम करत असाल तर उत्पादकता वाढवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा..

दिव्य मराठी

Mar 22,2020 12:05:00 AM IST

जर तुम्ही घरात बसून ऑफिसचे काम करत असाल तर उत्पादकता वाढवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा...


१. उत्पादकता वाढवणारे रुटीन असावे

सकाळी लवकर उठून तुमची सर्व कामे तशीच करा, जशी दररोज ऑफिसला जाताना करतात. निवांतपणे काम करणे टाळा. तुमचा लॉगिन टाइम सेट करा. तसेच ऑफिसमध्येही सर्वांना कळवा की, तुम्ही किती वेळ काम करणार आहात. सर्वात महत्त्वाची वेळ लक्षात घ्या. हा वेळ वाया घालवू नका. ही सकाळचीही वेळ असू शकते किंवा दुपारी जेवणानंतरची ही.


२. नॉइज कॅन्सलिंग हेडफोन्स

जर तुमच्यासह घरातील इतर सदस्यही वर्क-फ्रॉम-होम करत असतील तर तुमचे साधारण इअरपॉड्स कामी येणार नाही. अशावेळी तुम्हाला नॉइज कॅन्सलिंग हेडफोन्सची मदत होईल. यामुळे तुम्हाला संतुलित आवाज मिळतो तसेच हे दीर्घकाळ चालतात.


३. सतत विश्रांती

फीडबॅकसाठी एखादे काम पाठवले असेल आणि त्याचे उत्तर लवकर मिळत नसेल तर काळजी करू नका. सर्वच जण एका नवीन वेळापत्रकानुसार काम करत आहेत. अशावेळी तुम्ही खुर्चीवरून उठून थोड्यावेळ फिरूही शकतात. किंवा एक ग्लास लिंबू पाणीही घेऊ शकतात. उर्वरित कामे करू शकतात. जसे की, मशीनमध्ये कपडे टाकू शकतात, आ‌वश्यक फोन कॉल्स करू शकतात. यानंतर तुम्ही पुन्हा खुर्चीवर बसून पुढील काम करू शकतात. विश्रांती घेतल्यामुळे उत्पादकताही वाढते.


४. लॉगऑफ टाइम

लॉगऑफ टाइम अतिशय आवश्यक आहे. कारण ईमेल्स तपासण्यात आणि उर्वरित कामे करण्यात तुमचा बराच वेळ वाया जातो. असे होऊ नये यासाठी काम संपवायची वेळ तुम्हाला निश्चित करावी लागेल. हे फायदेशीरही आहे.


५. लाइटिंग

काम करताना खोली आणि डेस्कवरील लाइटवरही लक्ष ठेवा. साधारणत: डेस्क लाइट्सचा जास्त प्रकाश नसतो. यामुळे तुम्हाला कामात अडचण येऊ शकते. यासाठी ज्या डेस्कवर तुम्ही काम करत आहात तिथे पुरेसा प्रकाश असेल याची सोय करा.


६. ध्यान

वर्क फ्रॉम होम करत असताना कामावर लक्ष केंद्रित करणे कठीण होऊ शकते. सुरुवातीला तुमचे लक्ष लागणार नाही. अशावेळी घरातील कामे आणि ऑफिसची कामे यात समतोल साधणेही अवघड होते. यामुळे ध्यान करून तुम्ही कामावर लक्ष केंद्रित करू शकतात. मेडिटेशन अॅपचीही मदत घेऊ शकतात.


७. अॅक्टिव्हिटी वॉच

अॅपल, गार्मिन किंवा फिटबिट सारखे अॅक्टिव्हीटी वॉच मनगटावर असेल तर तुम्हाला वेळोवेळी रिमांइडर मिळत राहील. जसे की, प्रत्येक तासाला उभे राहण्याचे रिमाइंडर, पाणी पिण्याचे रिमांइड. अशा गोष्टी तुमच्या लक्षात राहतील.


८. पॉवर नॅप

जास्त आणि चांगले काम करण्यासाठी पॉवर नॅप्सची गरज आहे. टाइमर लावून नॅप घेऊ शकतात. यामुळे तुम्हाला काम करताना थकवा जाणवणार नाही.

X