आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हेल्थ:कम्फर्ट अन्न खाल्ले, तर हे आठ उपाय तुम्हाला हानीपासून वाचवू शकतात

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मिळायला आणि पचायला सुलभ चिप्स, कुकीज यांसारखे कम्फर्ट फूड शरीरात ग्लुकोजचे प्रमाण वाढवून हानी पोहोचवू शकतात...

ब्रेड, चिप्स किंवा मैद्यापासून बनलेले कोणतेही पदार्थ जास्त प्रोसेस्ड् असतात. त्यात फायबर उरतच नाही. त्यामुळे लवकर पचतात आणि शरीरात ग्लुकोजच्या रूपात साठतात. त्यामुळे रक्तातील साखर आणि इन्सुलिन वाढते. भूक कमी करणारे हार्मोन्स तयार होतात. पुढे चयापचयातून आरोग्यावर परिणाम होतो. ज्यामुळे लठ्ठपणा, टाइप -२ मधुमेह आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचा धोका वाढतो.

कम्फर्ट अन्नामागचे विज्ञान : एफडीएचे माजी आयुक्त आणि येल मेडिकल स्कूलचे माजी डीन डॉ. डेव्हिड ए. केसलर केसर यांच्या मते, तणावात असताना आपल्याला आराम हवा असतो. त्यामुळे आपण तयार आहे ते खायला मिळाले तर चांगले, अशा विचाराने कम्फर्ट फूडकडे वळतो. यात ब्रेड, चिप्स, पिझ्झा, बर्गर आदी पदार्थ येतात. या जवळपास ६० ते ७० टक्के प्रोसेस्ड् अन्नात रिफाइंड गहू्, मक्का, तांदूळ, बटाटे आणि इतर फार्स्ट कॉर्ब्ज आढळतात. हे पदार्थ तयार करण्यासाठी एक्सट्रूझन तंत्राचा वापर केला जातो, ज्यामुळे धान्यांची रासायनिक रचना बदलते, ज्यामुळे ते लवकर पचतात.

हे ५ पदार्थ पचनासाठी उपयुक्त आहेत
1. अंडी आणि आम्लेट

अंड्यात उच्च प्रथिनांसोबत अमिनो अॅसिड १६ आढळते. ते हलक्या अन्नाद्वारे विषारी द्रव बाहेर टाकण्यास मदत करते. त्यामुळे आरोग्य उत्तम राहते.

2. आले, पुदिन्याचा चहा
आले किंवा पुदिन्याचा चहा पाचक आहे, अन्ननलिकेसाठी तो आरामदायी असतो. गॅसचा त्रास कमी होतोे. पोटाच्या विविध विकारांनावर तो गुणकारी आहे.

3. केळी आणि नारळ पाणी
केळी व नारळ पाण्यामुळे पोटॅशियमची कमतरता दूर होते. ते स्नॅक्सद्वारे शरीरात वाढलेले मीठ संतुलित करते.

4. ग्रीन टी
यात अँटीऑक्सिडंट असतात जे जंक फूडद्वारे पेशींना होणाऱ्या नुकसानापासून वाचवतात.

5. खरबूज, संत्र्यासारखी रसदार फळे
जंक फूड खाल्ल्यानंतर, खरबूज, द्राक्षे, संत्री, पीच आणि रास्पबेरी अशी फळे खावीत. ही फळे हायड्रेट ठेवण्यासह जीवनसत्त्वे आणि खनिजे पुन्हा जमा करण्यास मदत करतात.

धोक्यापासून वाचण्याचे उपाय
१. स्लो कार्ब्जचे सेवन करा

बीन्स, हलके अन्न, शेंगादाणे, फळे आणि भाज्या इत्यादी पदार्थ पचण्याचा पूर्ण टप्पा पार पाडतात. या प्रक्रियेत ते हळूहळू ग्लुकोज आणि GLP-1 नावाचे हार्मोनही सोडतात. या हार्मोनमुळे आपल्याला पोट भरल्याची सूचना मिळते.

२. कोलेस्ट्रॉल नियंत्रित करा
एलडीएल कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी आहारात पालेभाज्यांचा समावेश करा. यूएस नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित संशोधनानुसार, अशा आहाराने लठ्ठपणा कमी होतो.

३. नियमित व्यायाम करा
अमेरिकेच्या डिपार्टमेंट ऑफ हेल्थ अँड ह्यूमन सर्व्हिसनुसार, प्रत्येकाने दर आठवड्याला किमान १५० मिनिटे मध्यम गतीने किंवा ७५ मिनिटे अधिक वेगाने व्यायाम केला पाहिजे.

बातम्या आणखी आहेत...