आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

हेल्थ :या संकेतांकडे दुर्लक्ष केल्यास वाढू शकतो आजार, करू नका याकडे दुर्लक्ष

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आपले शरीर वेदना, ताप, सूज याच्या माध्यमातून आजारांचे सायलेंट संकेत देत असते

आपले शरीर वेदना, ताप, सूज याच्या माध्यमातून आजारांचे सायलेंट संकेत देत असते. या संकेतांकडे दुर्लक्ष केल्यास आजार वाढू शकतो. आज आम्ही तुम्हाला असेच 10 सायलेंट संकेत सांगत आहोत, जे गंभीर आजाराचे कारण ठरू शकतात.


युरीनमध्ये बदल

युरीनचे प्रमाण कमी किंवा जास्त असणे डायबिटीज किंवा प्रोस्टेट कॅन्सरचे कारण ठरू शकते. युरीनचा डार्क यलो कलर लिव्हरच्या  खराबीमुळे असू शकतो.


खाज किंवा स्किन रॅशेज

अनेक दिवसांपासून होणारी खाज आणि रॅशेजकडे दुर्लक्ष करू नका. हे डायबिटीज किंवा किडनी आणि लिव्हरच्या प्रॉब्लेममुळे होऊ शकते.


सूज

शरीरावर सूज येण्याचे कारण रक्ताची कमी, किडनी किंवा लिव्हरची खराबी किंवा शरीरात पाणी जमा होणारा अॅडिमा नामक आजार असू शकतो.


विनाकारण वजन कमी होणे

विनाकारण वजन 5 किलोपेक्षा जास्त कमी होणे, कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचा संकेत असू शकते. याकडे दुर्लक्ष करू नका.


हँडरायटिंगमध्ये बदल

एक पानावर लिहिताना प्रत्येक लाईनवर हँडरायटिंगमध्ये होणारा बदल पार्कींसन्स डिसीजसारख्या न्यूरोलॉजिकल डिसॉर्डरचा संकेत असू शकतो.


झोपेत दात वाजवणे

असे स्ट्रेस किंवा जास्त नशा केल्याने, औषधी घेतल्याने किंवा पोटातील जंतामुळे होऊ शकते.


दातांच्या हिरड्या कमजोर पडणे

दातांच्या मागील भाग कमजोर होण्याचे कारण अॅसिडिटीचा प्रॉब्लेम असू शकतो. जास्त दिवस अॅसिडिटीचा त्रास नुकसानदायक आहे.


पोट खराब होणे

वारंवार डायरिया किंवा बद्धकोष्ठतेची समस्या असल्यास कोलोन किंवा ओव्हरियन कॅन्सर होण्याचा धोका राहतो.


जास्त घाम येणे

जास्त घाम आल्यामुळे हायपरहायड्रोसीस नावाचा आजार किंवा थायरॉइडची समस्या निर्माण होऊ शकते.


थकवा किंवा कमजोरी

अॅनिमिया, डायबिटीज, थायरॉइड प्रॉब्लेम, डिप्रेशन, ताप यासारख्या आजारांमुळे थकवा आणि कमजोरी होऊ शकते.

0