आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराQ. कमकुवत प्रतिकारशक्तीचे लक्षण कोणते? त्याचा इशारा कसा समजून घ्यावा? A. वारंवार आजारी पडणे, वारंवार संसर्ग (फुप्फुस, आतड्यांसंबंधी किंवा त्वचेचा संसर्ग), वजन कमी होणे, यकृत, प्लीहा आणि लिम्फ नोड्स वाढणे किंवा इम्युनोग्लोबुलिन कमी होणे ही कमकुवत प्रतिकारशक्तीची लक्षणे आहेत. Q. धावताना लगेच थकवा जाणवतो. श्वास घेण्यासही त्रास होतो. ही कशाची लक्षणे आहेत? A. याची अनेक कारणे असू शकतात - कमी हिमोग्लोबिन, हृदय किंवा फुप्फुसाचे आजार, लठ्ठपणा हेसुद्धा याचे कारण असू शकते. Q. झोपेचाही प्रतिकारशक्तीशी संबंध आहे का? निरोगी व्यक्तीने किती तास झोपावे? A. झोपेचा रोगप्रतिकारक शक्तीशी जवळचा संबंध असल्याचे संशोधनातून दिसून आले आहे. निरोगी व्यक्तीने ७ ते ८ तास झोप घेणे आवश्यक आहे, जे रात्री उशिरापर्यंत जागे राहतात त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. Q. रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे कोणते व्यायाम आहेत? A. दररोज ३० ते ४५ मिनिटे चालणे, योगा करणे किंवा कोणताही खेळ खेळल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. Q. चांगल्या प्रतिकारशक्तीसाठी आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश केला पाहिजे? A. कोणत्याही विशिष्ट प्रकारचे अन्न खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती सुधारत नाही. संतुलित आहार उत्तम. घरगुती भारतीय अन्न सर्वोत्तम आहे. Q. रोजच्या कोणत्या सवयी रोगप्रतिकारशक्ती कमकुवत करतात? अशा कोणत्या सवयी रोग प्रतिकारशक्तीसाठी चांगल्या आहेत? A. उशिरा उठणे, मद्यपान व धूम्रपान आणि नकारात्मक विचारसरणी… या सर्वांमुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. संतुलित आहार, व्यायाम, योगासने, पुरेशी झोप या सर्वांमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
डॉ. (ले. जनरल) वेद चतुर्वेदी प्राध्यापक, सर गंगाराम हाॅस्पिटल, नवी दिल्ली
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.