आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहिवाळ्यात पालक, मेथी, मोहरी, सोयासह आणखी एक हिरवी भाजी बाजारात मिळते. ती म्हणजे हरभऱ्याची भाजी. हिरवा हरभरा म्हणजेच हिरवे चणेही मिळतात जे फोलेट, व्हिटॅमिन ए, सी, कार्बोदके, प्रथिने, फायबर, लोह आणि इतर पोषक तत्वांनी परिपूर्ण असतात.
तुम्ही विचार करत असाल की, हरभऱ्याची भाजी मिळत आहे तर हिरवे चणे कसे मिळत आहेत. याचे कारण आहे की, रबीमध्ये शेतकरी हरभरे पेरतात. हरभऱ्याला शेंगा लागायच्या आधी त्याच्या कोवळ्या पानांचा भाजीसाठी वापर केला जातो. हरभरा थोडा वाढला की त्याला शेंगा लागतात. यानंतर या शेंगेतील कोवळे दाणे खाण्यास चवदार लागतात. याला काही ठिकाणी हरियाल बूटही म्हटले जाते.
व्हिटॅमिन ए आणी सी ने भरपूर असतात
डाएटिशिएन डॉ. विजयश्री प्रसाद सांगतात की चणा आणि चण्याच्या भाजीत व्हिटॅमिन ए आणी सी जास्त प्रमाणात असते. व्हिटॅमिन सी प्रतिकारशक्तीसाठी आवश्यक आहे. यातील अँटिऑक्सिडन्टस शरिरात लाल रक्तपेशींचे कार्य सुधारतात. यामुळे आपल्या शरिराची प्रतिकारशक्ती वाढते. यात व्हिटॅमिन ए ही मोठ्या प्रमाणात आढळते. व्हिटॅमिन ए डोळ्यांच्या आजाराचा धोका कमी करते. याच्या उणीवेमुळे रातांधळेपणा, डोळ्याच्या पांढऱ्या भागावर डाग, डोळ्यांचे इथर आजार होऊ शकतात.
वजन कमी करण्यास मदत होते
हिरव्या चण्यांत फायबर भरपूर असते. त्यामुळे कच्चे चणे भाजून खाल्ल्यास खूप वेळ भूक लागत नाही. हे पचवायला वेळ लागतो. म्हणून नियमितपणे आहारात चण्यांचा समावेश असला तर वजन कमी करता येते.
फील गूड हार्मोन वाढवतात चणे
हिवाळ्याच्या दिवसांत सिरेटोनिन म्हणजेच फील गूड हार्मोनचे प्रमाण घटू लागते. याचा थेट परिणाम आपल्या मूडवर होतो. जेव्हा याची पातळी घटते तेव्हा आपल्याला आळस, नैराश्य वाटू लागते. अनेकदा हिवाळ्यात चिंता, ह्रदयाची स्पंदने वाढणे, छातीत दुखणे असे त्रास होतात. हिरव्या चण्यात फोलेट म्हणजेच व्हिटॅमिन B9 असते. डॉ. विजयश्री प्रसाद सांगतात की हिवाळ्यात सिझनल इफेक्टिव्ह डिसऑर्डरमुळे लोकांना नैराश्यासारखे वाटते. मूड स्विंग होतो. अशात हिरवे चणे खाल्ल्याने नैराश्यातून बाहेर येण्यास मदत होते. हिरवे चणे गर्भवती महिलाही खाऊ शकतात. तथापि याचे प्रमाण जास्त नको.
रक्तदाब नियंत्रणात ठेवते
हिरव्या चण्यात मॅग्नेशियम आणि पोटॅशियम जास्त प्रमाणात आढळते. त्यामुळे हे रक्तदाब नियंत्रणात ठेवते. आपले ह्रदय निरोगी ठेवते. यात बीटा सीटोस्टेरोल केमिकल असते. याला प्लान्ट स्टेरोलही म्हणतात. यामुळे कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी करण्यास मदत होते. याचे सेवन केल्याने प्रोस्टेट आणि दुसऱ्या पेशींची सूजही कमी होते.
स्नायूंना मजबूती मिळते
मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी प्लान्ट बेस्ड प्रोटिन गरजेचे असतात. जेव्हा नियमित आहारात हिरव्या चण्याचा समावेश करतो तेव्हा शरीराला भरपूर प्रोटिन मिळतात. स्नायूंना ताकद मिळते. ज्या महिलांना केस गळण्याची समस्या असते त्यांनी हिरवे चणे किंवा चण्याची भाजी खाल्ली पाहिजे. यामुळे नखांमध्येही चमक येते.
फॅटी अॅसिडचे पॉवरहाऊस आहे हिरवे चणे
ताज्या हिरव्या चण्याला फॅटी असिडचे पॉवरहाऊस म्हटले जाते. फॅटी अॅसिडला ब्युटरेट म्हटले जाते. हे क्लोनोसाइटससाठी इंधनाचे काम करते. हे आपल्या पचनसंस्थेसाठी उपयोगी असते. अनेक प्रकारच्या गंभीर आजार, जसे मधुमेह आणि कॅन्सर थांबवण्यातही हे सहाय्यकारक असते.
100 ग्रॅम हिरव्या चण्यात हे पोषक घटक
हिरवे चणे खाण्याचे हे फायदे
हिरवे चणे कसे शिजवावे
हिरवे चणे कच्चे किंवा भाजून खाल्ले जातात. हरभऱ्याच्या झाडाला दाणे लागलेले असतात तेव्हा ते भाजूनही खातात. ग्रामीण भागात याला हुरडा म्हणतात. हिरवा चणा मोहरीच्या तेलात सहज शिजवता येतो. हे दुसऱ्या भाज्यांच्या ग्रेव्हीतही मिसळले जाते. बेसणात मिसळून याचे भजे बनवले जातात. हिरव्या चण्याची डाळही बनवली जाते. हे उकळून मिक्सरमध्ये वाटून घेतात, मग याची डाळ तयार होते.
चण्याच्या भाजीची रेसिपीही तयार होते. यासाठी कोवळी पाने हवी असतात. हे एकत्र बारीक चिरतात. नंतर उकळतात. कढईत मोहरीच्या तेलात परतून घेत चण्याची भाजी टाकतात. यात लसणाच्या पाकळ्या टाकतात. थोडा वेळ परतल्यानंतर ते काढून घेतात. चण्याचा हलवाही बनवला जातो. होळीला उत्तर भारतात अनेक ठिकाणी चण्याची बर्फी बनवली जाते. तूप, खवा आणि ड्राय फ्रूटसह बनवल्यावर याची चविष्ट डिश तयार होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.