आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lifestyle
  • Health
  • Increase Children's Immunity With Homemade Pickles And Chutney In The Era Of Corona, Physical Activity Of 1 Hour Daily Is Also Necessary; News And Live Updates

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेपूर्वी:सप्लीमेंट किंवा औषधाने नव्हे तर घरघुती आहाराने वाढवा मुलांची रोग प्रतिकारशक्ती

नवी दिल्ली15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लहान मुलांसाठी जोपर्यंत लस येत नाही तोपर्यंत रोगप्रतिकार शक्ती वाढवणे गरजेचे

कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव दिवसेंदिवस कमी होत आहे. परंतु, येत्या काही दिवसांत कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचे काही तज्ञांच्या म्हणणे आहे. कोरोनाची तिसरी लाट ही लहान मुलांना जास्त धोकादायक असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे लहान मुलांसाठी जोपर्यंत लस येत नाही, तोपर्यंत त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढवणे खूप गरजेचे आहे. रोग प्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यासाठी फूड सप्लीमेंट किंवा महाग डायट घेण्याची गरज नाही. त्यासाठी फक्त घरात असलेले खाद्यपदार्थ योग्य पद्धतीने घेण्याची गरज आहे.

सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट रुजुता दिवेकर यांनी लहान मुलांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काही टिप्स शेअर केल्या आहेत. त्यामध्ये त्यांनी 5 प्रकारच्या पदार्थाबाबत सांगितले आहे. तर मग जाणून घेऊया ते 5 पदार्थ कोणते आहे...

लोकन आणि सीजनल फळ
कोरोनादरम्यान, लहान मुलांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी दिवसातून कमीतकमी एकदा त्यांना लोकल किंवा हंगामी फळे खायला द्या. जर मुलाला ते आवडत नसेल तर कमीतकमी एक तुकडा खायला दिला तरी चालेल. यामध्ये किवी किंवा जाभूंळ, आंबा, पपई, मनुका यासारख्या फळांचा आहारामध्ये समावेश करा.

फायदा काय... यामुळे पोटातील चांगल्या बॅक्टेरियांमध्ये वाढ होते, जे पोटाला निरोगी ठेवते.
फायदा काय... यामुळे पोटातील चांगल्या बॅक्टेरियांमध्ये वाढ होते, जे पोटाला निरोगी ठेवते.

हलवा किंवा लाडू

संध्याकाळी 4 ते 6 वाजेदरम्यान, उपासमारीच्या वेळी काहीतरी निरोगी खाणे आवश्यक आहे. यावेळी मुलांना गोड पदार्थ आणि काहीतरी साधे खायले द्या. उदाहरणार्थ, रोटीमध्ये तूप घालून गुळासोबत गुंडाळून खायला देणे किंवा रवाची खीर किंवा नाचणीचे लाडू खावू घाला.

फायदा काय… मुलांना यातून ऊर्जा मिळेल.
फायदा काय… मुलांना यातून ऊर्जा मिळेल.

तांदूळ

मुलांच्या आहारामध्ये तांदूळाचा समावेश करा. कारण हा पदार्थ लवकर पचन होतो. मुलांच्या डिनरसाठी डाळ, तांदूळ आणि तूप हे उत्तम पर्याय आहेत.

फायदा काय ... यामुळे पोषक तत्वे आणि विशेष अमीनो अॅसिड मिळते.
फायदा काय ... यामुळे पोषक तत्वे आणि विशेष अमीनो अॅसिड मिळते.

लोणचे किंवा चटणी

मुलांची प्रतिकारशक्ती वाढवण्यसाठी दररोज आपल्या घरातील लोणचे किंवा चटणी खायला द्या. ही साइड डिश पोटातील चांगल्या बॅक्टेरियांमध्ये वाढ करते.

फायदा काय ... यामुळे मुलांची रोग प्रतिकारशक्ती मजबूत होते आणि मुलांना आनंदी राहण्यास मदत करते.
फायदा काय ... यामुळे मुलांची रोग प्रतिकारशक्ती मजबूत होते आणि मुलांना आनंदी राहण्यास मदत करते.

काजू

मुलांच्या आहारात काजूचादेखील समावेश करायला हवा. हे मुलांना सक्रिय आणि ऊर्जावान ठेवण्यासाठी मदत करत असून सर्व मायक्रोन्यूट्रियन्स देते.

फायदा काय ... हे शरीरातील कोणत्याही प्रकारचे वेदना कमी करण्यास मदत करते.
फायदा काय ... हे शरीरातील कोणत्याही प्रकारचे वेदना कमी करण्यास मदत करते.
बातम्या आणखी आहेत...