आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आरोग्य:रोगप्रतिकार क्षमता वाढवा आणि कोरोनाला हरवा

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहार पद्धती

सध्या कोविड-19 या आजाराने सगळीकडे हा:हा कार पसरला आहे. या आजारावर अजूनही प्रभावशाली औषध उपलब्ध नाही. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय करणे हे सर्वात महत्त्वाचे आहे. याच धर्तीवर सध्या सगळीकडे प्रतिकारशक्ती  वाढवण्याची चर्चा होत आहे. या स्थितीत प्रत्येकाने प्रतिकार क्षमता म्हणजे काय आणि ती कशी वाढवावी याकडे लक्ष दिले पाहिजे. कोणत्याही आजाराला प्रतिकार करण्यासाठी शरीरात एक सक्षम प्रणाली असते त्यालाच आपण प्रतिकार क्षमता असे म्हणतो. रोगप्रतिकार क्षमता हे आपल्या शरीराचे असे कवच आहे ज्यामुळे कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव आपल्या शरीरात सहजरीत्या होत नाही. पण हीच प्रणाली शरीरात कमकुवत असेल तर आपण लवकर आजारी पडतो.

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहार पद्धती- 

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहारात चांगल्या प्रकारचे प्रथिने, जीवनसत्त्व क, अ, ई आणि अ‍ॅन्टीऑक्सिडंट मुबलक प्रमाणात असणे आवश्यक आहे.

> जीवनसत्त्व ‘क’ युक्त पदार्थाचे सेवन - संक्रमित रोगापासून बचाव करण्यासाठी  जीवनसत्त्व ‘सी’ महत्वाचे असते. सध्या बाजारात उपलब्ध असलेले  लिंबू , संत्री, मोसंबी, टोमॅटो, खरबूज, द्राक्षे हे जीवनसत्त्व ‘क चे उच्चतम स्रोत आहे. याचा आहारात जास्तीत जास्त समावेश करावा.

> जीवनसत्त्व ‘ई’ समृद्ध पदार्थाचा आहारात समावेश- जीवनसत्त्व ई हे  शक्तिशाली अ‍ॅन्टीऑक्सिडंट आहे. सुकामेवा, बदाम, अक्रोड, शेंगदाणे, डाळी व कडधान्य यांच्या सेवनाने पेशी अधिक सक्षमतेने संसर्गाचा सामना करू शकतात.

> जीवनसत्त्व ‘अ’ समृद्ध आहार घ्यावा – या जीवनसत्त्वामुळे शरीराचे जंतुसंसर्गापासून संरक्षण होते. फुफ्फुसे व रक्त यांचे पोषण होते. हिरव्या पाळेभाज्या जसे मेथी, अळू, शेपू, कडीपत्ता. कोथिंबीर, लाल भोपळा, गाजर, रताळी, अंड्याचा पिवळा भागा यामध्ये मुबलक प्रमाणात जीवनसत्त्व अ असते.

> पालकामध्ये जीवनसत्त्व ‘क’ व ‘ई’ सोबतच फोलेट, फायबर, अ‍ॅन्टीऑक्सिडंट हे महत्त्वाचे घटक  आहे. विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दैनंदिन आहारात पालकाचा समावेश करावा.

> लसणामध्ये भरपूर प्रमाणात झिंक, सल्फर, सेलीनीयम, जीवनसत्त्व अ व ई’ आढळतात त्यामुळे प्रतिकार क्षमता वाढते.

> आहारसोबतच नियमित व्यायाम व पूर्ण झोप ही प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी महत्त्वाची आहे.

सौ. रोहिणी भरड, विषय विशेषज्ञ, गृह विज्ञान -  ८१४९८२६०१३

डॉ. सौरभ शर्मा, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषि विज्ञान केंद्र, अंबाजोगाई

बातम्या आणखी आहेत...