आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

योगाभ्यास:लॉकडाऊनमध्ये योगासने करून वाढवा रोगप्रतिकारशक्ती

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी औषधी घेण्यापेक्षा योगासन करणे फायदेशीर आहे. दररोज योगासन केल्यास प्रतिकारशक्ती वाढते....

जे लोक नियमित योगा, व्यायाम करतात त्यांची रोगप्रतिकारशक्ती चांगली असते. काेरोनाची लागन होऊ नये यासाठी  योगाभ्यास, प्राणायाम व मुद्रा हे रामबाण उपाय आहेत. योगाभ्यास केल्यामुळे आपले शरीर स्वस्थ राहते व रोगप्रतिकारशक्ती वाढते. प्राणायाम केल्याने मानसिक शांती मिळते आणि आपण तणावमुक्त होतो.

कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी नियमित दररोज किमान अर्धा तास ते एक तास योगाभ्यास करायला हवा. वेगवेगळ्या प्रकारची खूप आसने आहेत. मात्र, सध्याच्या परिस्थितीत योगाची सुरुवात हात व पायाच्या सूक्ष्म व्यायामाने करावी. या आसनांचा आठवड्याचा तक्ता बनवावा.

असे समजून घ्या

विविध प्रकारच्या आसनांनी शरीराच्या भागांना आपण ताणतो, पीळ देतो किंवा प्रसरण करतो, त्याने सूक्ष्म अभिसरण वाढते. अभिसरण म्हणजे साध्या शब्दांत पोषक तत्त्वे आणि ऑक्सिजन सर्व पेशींपर्यंत पोचवणे आणि कार्बन डायऑक्साइड व विषारी द्रव्ये बाहेर फेकणे.

आसने : भुजंगासन, उष्ट्रासन, सूर्यनमस्कार, मत्स्यासन, धनुरासन, उर्ध्वहस्तासन, अधोमुखश्वानासन, त्रिकोणासन, योगमुद्रा, हलासन इ.

उष्ट्रासन योग

गुडघ्यावर उभे राहा. आता मागच्या बाजूला वाकून हाताने टाचांना पकडण्याचा प्रयत्न करा. डोके आणि पाठीच्या कण्याला जास्तीत जास्त मागे वाकवा. १०-१५ मिनिटे याच स्थितीत राहा. या योगासनामुळे दम्याच्या रुग्णांसाठी हे उत्तम आसन आहे. मधुमेहाला ठीक करते. फुप्फुस मजबूत होते

पर्वतासन योग

उजव्या पायाला सरळ करून डाव्या पायाजवळ ठेवा. शरीराला हातावर संतुलित करा. आता कंबरेच्या भागाला जास्तीत जास्त वरच्या बाजूला उचला. डोके दोन्ही हातांमध्ये आणा. हातांना सरळ ठेवा आणि टाचा जमिनीला टेकवा. कंबरेला वर उचलत हळूहळू श्वास सोडा. या योगासनामुळे रक्तप्रवाहामध्ये वाढ होते. दृष्टी चांगली होते. शरीराची लवचिकता वाढते.

कपालभाती 

हा श्वसनाचा व्यायाम असला, तरी तो प्राणायाम नाही - एक शुद्धिक्रिया आहे. नाक, सायनस व फुप्फुसांमधील घाण बाहेर फेकण्यात कपालभातीचा उपयोग होतो. कपालभातीचे शेकडो शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक फायदे आहेत, त्यामुळे तो जरूर करावा. अनुलोम-िवलोम व भस्त्रिका प्राणायामदेखील करावेत. यामुळे फुप्फुसांची कार्यक्षमता वाढते, त्यामुळे शरीराची ऊर्जा वाढते. 

शारीरिक-मानसिक ताण, सवयी, झोप, आहार, जीवनशैली, व्यायाम, विश्रांती व सकारात्मक विचार या सर्व गोष्टींचा नकळतपणे अगदी खोलवर, म्हणजे पेशींपर्यंत आपल्या शरीरावर परिणाम होत असतो.  शरीर व मन या दोन्हींवर उत्तम इलाज म्हणजे योगासने करणे. योगासनांच्या मदतीने आपण रोगप्रतिकारशक्ती वाढवू शकतो. - डॉ. उत्तम काळवणे, योग शिक्षक

बातम्या आणखी आहेत...