आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संशोधन:वयोमानानुसार पाणी पिण्याचे प्रमाण वाढवा, वाढत्या वयाप्रमाणे उष्माघाताचा धोकाही वाढतो

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • डिहायड्रेशन रोखण्याचा उत्तम मार्ग म्हणजे पाणी

जर्नल ऑफ फिजिओलॉजिकल सोसायटीमध्ये प्रसिद्ध संशोधनानुसार, शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी व अन्य रोगांचा धोका कमी होण्यासाठी पुरेसे पाणी पिण्याची गरज असते. वयामुळे किंवा व्यायामादरम्यान घाम निघाल्यामुळे शरीर पाण्याची पातळी अॅडजस्ट करत नाही. त्यामुळे डिहायड्रेशनचा धोका वाढतो. वयस्करांमध्ये डिहायड्रेशनमुळे हीट लॉस कमी होत नाही किंवा शरीराचे तापमान वाढत नाही.

डिहायड्रेशन रोखण्याचा उत्तम मार्ग म्हणजे पाणी :
न्यूयॉर्कच्या माउंट सिनाई स्कूल ऑफ मेडिसिनच्या न्यूरोसायन्स विभागातील सहायक प्राध्यापक डॉ. निकोल अ‍वेना यांच्या मते, शरीर हाइड्रेटेड ठेवण्यासाठी पाणी हा एक चांगला मार्ग आहे. सोडा किंवा इतर पेय पिल्यामुळ शरीराला त्या घटकांवर प्रक्रिया करण्यासाठी परिश्रम घ्यावे लागतात, पण शरीराला कोणताही फायदा होत नाही.

अनियंत्रित तापमानामुळे उष्माघाताचा धोका: शरीराचे तापमान योग्यरित्या नियंत्रित केले नाही तर उष्माघात, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी समस्या उद्भवू शकतात. न्यूयॉर्कमधील ईस्ट साइड रिहॅबिलिटेशन अॅन्ड नर्सिंग सेंटरचे डॉ. नोडार जॅनस यांच्या मते, व्यक्तीची वयानुसार, कल्पित भागामध्ये तहान लागण्याची सक्रियता कमी होते. बऱ्याच वेळा मेंदू तहान भागविण्याचे संकेत पाठवत नाही.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser