आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कोरोना विषाणू आणि मान्सून:आर्द्रता वाढल्याने विषाणू वातावरणात दीर्घ काळ राहू शकतात, बंद ठिकाणी संसर्गाचा धोका जास्त

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पावसाळ्यात कोरोना वाढू शकतो हे सांगणारी तीन कारणे

मान्सूनच्या हंगामात कोरोना विषाणू काय करेल यावर सध्या काही सांगता येऊ शकत नाही. उन्हाळ्यात त्याचा प्रकोर कमी होऊ शकतो, अशी आशा जगभरातील नेत्यांनी आणि वैज्ञानिक समुदायाने आधी व्यक्त केली होती, पण तसे झाले नाही. भारतात मे, जूनच्या महिन्यातही संसर्ग वेगात वाढला. असे अनेक विषाणू हंगामी असतात. उदाहरणार्थ एन्फ्लुएंझाचा हिवाळ्यात किवा थंड तापमानात जास्त प्रभाव असतो. कांजण्या, गोवर यांसारख्या आजारांना हंगामात भर येतो. त्याने पीडित व्यक्तीला उन्हाळ्यात डायरिया होतो. असे का होते, हे कोणालाही माहीत नाही. अर्थात, व्हायरल फॅक्टर आणि होस्ट फॅक्टर (गर्दी, रोगप्रतिकारक शक्ती आणि लोकांची जनुके) दोन्हीही यासाठी जबाबदार असतात. डासांपासून होणारे मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया हे आजार पावसाळ्यात जास्त होतात. मान्सूनमध्ये आर्द्रता जास्त असल्याने त्यांचा संसर्ग जास्त होतो.

पावसाळ्यात कोरोना वाढू शकतो हे सांगणारी तीन कारणे

1. कोरोनात मास्क महत्त्वाचा मानला गेला आहे. पावसात जे लोक दुचाकीने प्रवास करतात किंवा पायी चालतात, त्यांचे मास्क भिजू शकतात. कोरडा मास्कचा घालावा, असे तज्ञ सांगतात. दुसरीकडे आर्द्र वातावरणात दीर्घ काळ मास्क लावणेही कठीण आहे.

2. पावसाळ्यात डेंग्यू आणि मलेरिया यांसारख्या आजाराचे रुग्ण वाढतात. त्यांची प्राथमिक लक्षणेही कोरोनासारखी असू शकतात. अशा स्थितीत घाबरून मोठ्या संख्येने रुग्ण रुग्णालयात गेले तर रुग्णालयांत संसर्गाचा धोका आणखी वाढेल.

3. पावसाळ्यात हवामानात आर्द्रता वाढते. विषाणू जास्त काळापर्यंत सक्रिय राहतात. बंद खोलीत संसर्गाचा धोका वाढू शकतो. आर्द्रता वाढल्याने एअरोसोल ट्रान्समिशनसाठी उपयुक्त परिस्थिती निर्माण होते. ते विषाणू लवकर नष्टही होऊ शकत नाहीत.

पावसात धोका कमी होण्याचे सूचित करणारी दोन कारणे

1. पावसाळ्यात तापमान, एसीचा वापर कमी होतो. अशा परिस्थितीत घरे आणि कार्यालयांमध्ये विषाणूचे अस्तित्व आणि प्रसारण कमी होईल.

2. संसर्गजन्य रोगांमध्ये थुंकणे धोकादायक मानले जाते. पावसामुळे थुंकी किंवा रस्त्यावरील विषाणू धुतला जातो किंवा त्याची तीव्रता कमी होते.

... अन् आयआयटीच्या अभ्यासानुसार कोरोना पावसाळ्यात वाढू शकतो

मुंबई आयआयटीचे प्रा. अमित अग्रवाल व प्रा. रजनीश भारद्वाज यांच्या अभ्यासानुसार पावसाळ्यात आर्द्रता वाढल्यामुळे कोरोनाचा धोका वाढू शकतो. संशोधनात आढळले की, उष्ण आणि कोरड्या हवामानात खोकला आणि शिंकण्यापासून निघणारे सूक्ष्म थेंब लवकर कोरडे होतात, तर पावसात ते संसर्गजन्य राहू शकतात. हे अध्ययन १ मार्च ते १० एप्रिल २०२० पर्यंत करण्यात आले. त्या सहा परदेशी शहरांचा अभ्यास समाविष्ट आहे.

डॉ. सपन सी. पांड्या

रुमॅटोलॉजिस्ट आणि क्लिनिकल इम्युनोलॉजिस्ट, सहायक प्राध्यापक रुमॅटोलॉजी, श्रीमती एनएचएल मून मेडिकल कॉलेज आणि एसव्हीपी रुग्णालय, अहमदाबाद.