आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
देशातील सर्वात प्राचीन योग यूनिव्हर्सिटीमधून रिपोर्ट (आशुतोष रंजन)
आज सहावा जागतीक योग दिवस आहे. कोरोना महामारीमुळे आपापल्या घरातूनच योग दिवस साजरा केला जाणार आहे. तुम्हीदेखील जिथे आहात, तिथे राहून योगाद्वारे स्वतःला निरोगी ठेवा. कोरोना विरोधातील लढाईत योगा एक उत्तम पर्याय आहे. जेव्हापासून हा व्हायरस समोर आला आहे, तेव्हापासून एकच गोष्ट सांगितले जात आहे. तुमचे फुफ्फुस आणि रोग प्रतिकारक शक्ती चांगली असल्यास तुम्ही कोरोनाला हरवू शकता.
जागतीक योग दिवसावर भास्करने देशातील एकमात्र योग यूनिव्हर्सिटी 'बिहार स्कूल ऑफ योग'चे प्रमुख पद्यभूषण स्वामी निरंजनानंद यांच्याशी बातचीत केली. त्यांनी कोरोनाला हरवण्यासाठी योगातील नेती क्रिया, 4 प्रणायाम आणि 8 आसन सांगितले आहेत. हे करुन तुम्ही आपली रोगप्रतिकारक शक्ती आणि फुफ्फुसांना मजबूत करू शकता.
जल नेतीदरम्यान या 4 गोष्टी लक्षात ठेवा
1- या क्रियेला बसून, सरळ उभे राहून किंवा दोन्ही पायांमध्ये समान अंतर ठेवून करू शकता. या क्रियेदरम्यान डोळे बंद करणे गरजेचे आहे. असे न केल्यास डोळ्यातून पाणी येऊ शकते.
2- तोंडावाटे श्वास घेणे गरजेचे आहे, नाकातून श्वास घेतल्यास पाणी मेंदूत जाऊ शकते.
3- पाणी सहज बाहेर येऊ शकेल, अशा पद्धतीने कंबरेला वाकवा. पाण्याचा प्रवाह फक्त नाकातून असावा. जर पाणी गळा किंवा तोंडात येत असेल, तर समजून घ्या की, आपल्या डोक्याची स्थिती योग्य नाहीये.
4- नाक आणि मेंदूचा आजार असल्यास नाकाला वाळवण्यासाठी जोराने श्वास आत घेऊ नका.
जलनेतीने कोरोनापासून कसा बचाव होतो ?
कोरोना व्हायरस नाकातून शरीरात प्रवेश करतो आणि सर्वात आधी गळ्यावर अटॅक करतो. यानंतर हा फुफ्फुसात प्रवेश करुन संक्रमण पसरवतो. जल नेतीमुळे हा व्हायरस नाकातच संपून जातो. कोरोना पीड़ित व्यक्तीला श्वास घेण्यास त्रास होतो. अशा परिस्थिती नाक मोकळे होते. यामुळे फुफ्फुसांना पूर्ण ऑक्सीजन मिळतो. ज्यांना दमा, निमोनिया आणि ब्रॉनकाइटिसचा आजार आहे, अशांनाही याचा फायदा होईल.
जलनेती नाकात आणि सायनसमध्ये जमा झालेल्या सेलेस्माला बाहेर काढते. यासोबतच गळ्यात जमा झाळेल्या कफलाही बाहेर काढते आणि नेहमी होणारा कफचा त्रासही यामुळे दूर होतो. ही क्रिया डोळे आणि कानासाठीही फायद्याची ठरते. तसेच, वायु प्रदूषणाम आणि एलर्जीमुळे येणारी ताप आणि टॉन्सिलचाही त्रास कमी होतो.
रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे 4 प्राणायाम
जल नेती क्रियाशिवाय योगाचे 4 आसान आहेत, जे रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. कपालभाती, अनुलोम-विलोम, भस्त्रिका आणि भ्रामरी प्राणायम हे चार आसन आहेत. जल नेतीनंतर भस्त्रिका आणि कपालभाती आवश्य करा. यामुळे नाकातील सर्व पाणी निघून जाईल आणि फ्रेश वाटेल. जल नेती, भस्त्रिका आणि कपालभाती केल्यानंतर कमीत-कमी एक तास काहीच खाऊ नका. एक किंवा दोन ग्लास कोमट पाणी पिऊ शकता.
1- कपालभाती: हे आसन फुफ्फुस आणि पोटासाठी फायदेशीर आहे. यामुळे इम्यूनिटी वाढते. हाय ब्लड प्रेशर असलेल्या या प्राणायामला हळु-हळू करा. दररोज कमीत कमी 15 मिनीटे हे आसन करा.
2- अनुलोम-विलोम: हे प्राणायाम शरीराच्या आतील हवा शुद्ध करतो. फुफ्फुसाला निरोगी ठेवण्यासाठी हे खूप फायदेशीर आहे.
3- भस्त्रिका: या प्राणायामला करण्यासाठी पद्मासनात बसावे. यामुळे इम्यून सिस्टीम मजबूत होते. तसेच वात, पित्त आणि कफच्या त्रासापासून मुक्ती मिळते. दररोज कमीत कमी 10 मिनीटे हे आसन करावे.
4- भ्रामरी: हे प्राणायम डिप्रेशन असलेल्या लोकांसाठी खूप फायद्याचे आहे. यामुळे रात्री चांगली झोप येते. याला दोन ते तीन मिनीटे करू शकता.
या 8 आसनामुळे वाढेल इम्यून सिस्टीम-
जलनेती आणि 4 प्राणायामनंतर या आठ आसनाद्वारे वाढवू शकता इम्यून सिस्टीम- शीर्षासन, सर्वांगासन, चक्रासन, कान्द्रासन, उष्ट्रासन, भुजंगासन, मयूरासन आणि व्याघ्रासन.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.