आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करात्वचा हा शरीराचा सर्वात मोठा अवयव आहे. त्यामुळे शरीरावर मानसिक, शारीरिक आणि हार्मोनल अशा कोणत्याही स्तरावर होणाऱ्या बदलांचा परिणाम सर्वप्रथम त्यावर दिसून येतो. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या मते, तुम्ही तणावाखाली असता तेव्हा तुमचे शरीर कार्टिसॉल हार्मोनचे जास्त उत्पादन करते. हा संप्रेरक वेगवेगळ्या प्रभावांच्या स्वरूपात येतो. हेल्थलाइन मासिकातून जाणून घ्या तणावाचा त्वचेवर कसा परिणाम होतो.
फळे आणि नट्स तणाव कमी करण्यासाठी प्रभावी त्वचारोगांचेही कारण मेंदूमध्ये विचार अनियंत्रितपणे चालू लागतात तेव्हा त्वचेच्या संरक्षणात्मक क्षमतेवर परिणाम होतो. अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनच्या मते, तणावामुळे त्वचा संतुलित राहू शकत नाही, त्यामुळे इचिंग किंवा खाज सुटणे सुरू होते. तथापि, इतर कारणेदेखील असू शकतात.
केस गळणे, नखे तुटणे ज्या काळात ग्रंथी कार्टिसॉल हार्मोन तयार करते, त्या काळात केस निरोगी ठेवणाऱ्या हार्मोनचे उत्पादन कमी होते. हा हार्मोन चयापचय, मेंदूची क्रिया, पेशींच्या पुनरुत्पादनावर परिणाम करतो, ते नखांमध्ये प्रतिबिंबित होते. ती कमकुवत होतात आणि तुटू लागतात.
जखमा भरण्यास विलंब खरे तर जास्त ताणतणाव झाल्यावर त्वचेचा वरचा थर कमकुवत होतो, त्यामुळे संसर्ग होण्याचा धोका वाढतो. जखमा, चट्टे आणि पुरळ बरे करण्याच्या त्वचेच्या नैसर्गिक क्षमतेवर याचा परिणाम होतो.
काय करावे : तणाव व्यवस्थापनासाठी योग किंवा ध्यान करा. आर्टिफिशियल फूड किंवा गोड पदार्थ टाळा. यात एस्पार्टम हा घटक आढळतो, त्यामुळे मानसिक समस्या वाढू शकतात. फळे आणि नटा्सचे सेवन करा. ते रक्तदाब कमी करतात. दिनचर्या नियमित करण्याचा प्रयत्न करा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.