आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावजन घटवण्याच्या विविध पद्धती लोकांकडून रोज ऐकायला मिळतात.कुणी अधून मधून उपवास करण्यावर विश्वास ठेवतो तर कुणी नियमित वेळेवर जेवण्याचा सल्ला देतो. मात्र, नुकतेच जर्नल ऑफ द अमेरिकन हार्ट असोसिएशनमध्ये प्रकाशित एका संशोधनानुसार, तुम्ही कोणत्याही वेळेत जेवण केले तरी त्यामुळे फरक पडत नाही. उलट किती भोजन करता याचा खूप फरक पडतो.
संशोधनानुसार, इंटरमिटेंट फास्टिंग अर्थात अधून मधून उपवासामुळे वजन घटण्याच्या प्रक्रियेवर कोणताही फरक पडत नाही. या संशोधनासाठी ५०० पेक्षा जास्त लोकांच्या ६ महिन्यांपर्यंत सवयीची माहिती घेऊन देखरेख केली. त्यात कधी जेवण केले, दिवसात किती वेळा खाल्ले आणि किती प्रमाणात खाल्ले याची नोंद ठेवली. ६ महिन्यांनंतर समोर आले की, कधी खाल्ले किंवा किती वेळानंतर खाल्ले याचा त्याच्या वजनावर परिणाम झाला नाही. वजन कमी किंवा जास्त होणे हे त्यांच्या कमी, जास्त किंवा सरासरीच्या कॅलरीच्या जेवणावर अवलंबून होते.ज्यांनी कमी खाल्ले त्यांचे वजन कमी झाले तर ज्यांनी जास्त खाल्ले त्यांचे वजन वाढले. युनिव्हर्सिटी ऑफ इलिनोइसचे संशोधक व इंटरमिटेंट फास्टिंगवर अभ्यास करणारे वाराडी क्रिस्टा यांच्या म्हणण्यानुसार, इंटरमिटेंट फास्टिंगमध्ये केवळ नियमित वेळेत जेवण्याचा काहीही परिणाम होत नाही. कमी उष्मांकाचे भोजन घेणे त्यासाठी आवश्यक ठरते. याचा परिणाम वजनावर दिसतो आणि वजन कमी होते. जॉन हॉप्किन्स स्कूल ऑफ मेडिसिनच्या असोसिएट प्रो.डॉ. निशा मरुथूर म्हणाल्या, खाण्यात कॅलरीचे प्रमाण समान असेल तर वजन कमी करणे कठिण आहे. इंटरमिटेंट फास्टिंगमध्ये लोक केवळ सकाळी १० ते सायं.४.०० पर्यंत खातात आणि यादरम्यान कॅलरीचे कमी सेवन केल्यास वजन कमी होण्याची शक्यता जास्त होते.अमेरिकेत एकूण लोकसंख्येच्या ४१.९% लोकसंख्या लठ्ठपणाशी झगडत आहे.
अमेरिका : लठ्ठपणाशी झगडणारे उपचारावर १.५० लाख जास्त खर्च करतात अमेरिकेत गंभीर लठ्ठपणाशी झगडणारी लोकसंख्या ४.७% वरून ९.२% झाली आहे. अमेरिकेत लठ्ठपणाशी झगडणारे लोकांचा उपचारावर वार्षिक १४ लाख कोटी रु. खर्च होतो. लठ्ठ व्यक्तीचा उपचारावर होणारा वार्षिक खर्च सामान्य व्यक्तीपेक्षा १.५० लाख रु. जास्त होतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.