आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेल्फ हेल्प:लहान सवयींकडे लक्ष देणे फायदेशीर

औरंगाबाद19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लहान सुरुवात मोठे लक्ष्य प्राप्त करेल
मोठे उद्दिष्ट, जसे की एक तास ध्यानधारणा किंवा अभ्यासासाठी वेळ काढणे, अवघड वाटतात. लहान सवयींकडे लक्ष द्या. काही सेकंद ध्यान करा, दररोज रात्री ३०-४० ओळी वाचन करा. दात घासताना पुस्तकातील ३०-४० ओळी वाचा. कॉफी तयार होईपर्यंत ध्यान करा. तुमच्या प्रगतीचा मागोवा घ्या. लहानापासून सुरुवात करून तुम्ही मोठे उद्दिष्ट प्राप्त करू शकता.

अवेकन द जायंट विदिन
साचलेपणापासून दूर राहायचे, चुका स्वीकारा

आपल्याच मुद्द्यावर अडून राहण्याचा स्वभाव तुमच्या प्रगतीच्या मार्गातील अडसर ठरू शकतो. अडेलतट्टूपणापासून मुक्तीसाठी जुनाट विचार त्यागावे लागतील. साचलेपण येण्यापासून वाचायचे असेल तर चुका स्वीकारायला शिका. चूक असल्याचे सिद्ध झाल्यानंतरही जी व्यक्ती नवीन विचार स्वीकारायला तयार असते ती श्रेष्ठ असते. यासाठी धाडस लागते.

द पाॅवर ऑफ पॉझिटिव्ह थिंकिंग
तुमच्या अडचणी तुम्हालाच सोडवायच्या आहेत

जास्त काम करून त्रस्त, दबावात असाल तर त्यासाठी इतरांना जबाबदार धरणे चूक आहे. तुमच्या अडचणी तुम्हालाच सोडवाव्या लागतील. परिस्थिती कशीही असली तरी योग्य निवड करून वर्तमान आणि भविष्य सुरक्षित करण्याची ताकद, क्षमता माझ्यात आहे, याची जाणीव स्वत:ला वेळोवेळी करून द्या. स्वत:ला विश्वास द्या की सर्व तुमच्या नियंत्रणात आहे.

मॅनेजिंग थॉट
चांगल्या विचाराला मोठ्या विचारात कसे बदलावे

तुम्ही चांगल्या विचाराला मोठ्या विचारात बदलू शकता. जॉन मॉन्टेग्यूला विचार सूचला. भूक लागल्यानंतर त्यांनी कूकला ब्रेडच्या दोन स्लाइसमध्ये चीज ठेवून द्यायला सांगितले. हा सँडविचचा जन्म होता. लिव्हाइ स्ट्रॉस यांनी तंबूच्या कापडापासून जीन्स तयार केली. बिल गेट्स यांनी प्रत्येक डेस्कवर संगणक ठेवला.

बातम्या आणखी आहेत...