आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आरोग्य:उन्हाळ्यात या पदार्थाने ठेवा शरीर थंड

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • उष्णतेत वाढ झाल्यामुळे शरीरातील व आतड्य़ातील स्निग्धता नष्ट होते. शरीरात पाण्याची गरज वाढते...

सध्या उन्हाचा तडाखा खूप वाढत आहे. त्यामुळे आपल्या शरीराचे तापमानही वाढते आिण अति उष्णतेमुळे शरीरातील पाणी कमी होते. उष्णतेत वाढ झाल्यामुळे शरीरातील व आतड्य़ातील स्निग्धता नष्ट होते. शरीरात पाण्याची गरज वाढते. शरीरातील तापमान सामान्य करण्यासाठी उन्हाळ्यात कोणते पदार्थ खावेत, याविषयी आम्ही तुम्हाला सांगत आहोत...

कोकम सरबत : दिवसभरात एखादा ग्लास कोकम सरबत घेतल्याने डिहायड्रेशन टाळता येते. शरीरातील पोषक तत्त्वांचा अभाव टाळतो येतो. याशिवाय भूकही वाढण्यास मदत होते व रक्ताचे शुद्धीकरणही होते. 

दही : दुधापासून तयार होणारे दही हे रुचकर आणि आरोग्यवर्धक माध्यम आहे. दह्यामध्ये उपयोगी जीवाणू असतात, ते शरीराला लाभदायक असतात. आयुर्वेदानुसार उन्हाळ्यात दुधापेक्षा दही खाणे अधिक फायद्याचे असते.

नारळाचे पाणी : उन्हाळ्यात  नारळाचे पाणी आरोग्यासाठी लाभदायक आहे. उष्मा आणि तीव्र उन्हामुळे शरीरातून घामाद्वारे अधिक पाणी बाहेर टाकले जाते. त्यामुळे नारळ पाणी पिणे उपयुक्त ठरते. नारळाच्या पाण्यात मीठ, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियमचे प्रमाण असते. एका नारळात ७५० मिलिलिटर पाणी असते.

कलिंगड : कलिंगड उन्हाच्या काहिलीपासून गारवा देतेच तसेच याच्या दैनंदिन सेवनामुळे शरीरातील पाण्याचे संतुलन कायम राहते. कलिंगड हे एक आरोग्यदायी फळ असून याचे अनेक फायदे आहेत.

काकडी : शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी काकडीचा चांगला उपयोग होऊ शकतो. काकडीत पाणी, कार्बोहायड्रेट्स आणि प्रथिनांचे प्रमाण जास्त असल्यामुळे शरीरासाठी ती आरोग्यदायी असते.

पुदिना : औषधी गुण, पचन क्रिया सुरळीत करण्याचे गुणधर्म आणि शरीरासाठी थंड असल्यामुळे उन्हाळ्यात पुदिना शरीरासाठी लाभदायक ठरतो. पुदिना ही स्वस्त व सहजपणे मिळणारी वनस्पती असते जे आपण दह्यात घालून सेवन करू शकता.

कांदे : कांद्यामध्ये थंडावा देणारे गुणधर्म आढळतात. कांद्याचा समावेश रस्सा, रायते, कोशिंबीर व चटणीमध्ये अवश्य करावा. ज्यामुळे शरीराला थंडावा मिळतो.

लिंबूपाणी : दिवसभरात एखादा ग्लास लिंबू सरबत घेतल्याने डिहायड्रेशन टाळता येते व शरीरातील पोषक तत्त्वांचा अभाव टाळता येतो. याशिवाय भूकही वाढण्यास मदत होते व रक्ताचे शुद्धीकरणही होते.

बातम्या आणखी आहेत...