आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना विषाणू संसर्ग:कारच्या खिडक्या तिरप्या खुल्या ठेवल्यास कमी होतो कोरोना विषाणू संसर्गाचा धोका

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • संसर्गबाधितासोबत कारमध्ये 20 मिनिटांचा प्रवासही धोकादायक

सन २०२० मध्ये जगभरातील कोरोना विषाणूच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी शास्त्रज्ञांनी संसर्गाचा धोका असलेल्या वेगवेगळ्या ठिकाणांचा अभ्यास केला, परंतु रोजच्या जीवनाचा एक भाग बनलेल्या कारबाबत फारसे संशोधन झाले नाही. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, कारचा आकार छोटा असल्याने त्यात शारीरिक अंतराचे पालन करणे जवळजवळ अशक्य आहे. अशा परिस्थितीत लहान एअरोसोल कण किंवा एअरोसोलद्वारे (श्वास घेताना किंवा बोलताना बाहेर पडणारे छोटे कण) कोरोना संसर्गाचा प्रसार होण्याचा धोका वाढतो. कारमध्ये होणाऱ्या संसर्गाचा धोका जाणून घेण्यासाठी मॅसाच्युसेट्स युनिव्हर्सिटीचे भौतिकशास्त्रज्ञ वर्गीस मथाई आणि ब्राउन युनिव्हर्सिटीमधील त्यांचे तीन सहकारी असिमान्शुदास, जेफ्री बेली आणि केनेथ ब्रेऊर यांनी एका काॅम्प्युटर मॉडेलद्वारे कारमध्ये विषाणू प्रादुर्भाव कसा कमी होऊ शकतो, हे शोधण्याचा प्रयत्न केला.

हवेशीर भागात बसण्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका कमी होतो
पोर्टलँड स्टेट युनिव्हर्सिटीमधील हवा गुणवत्ता तज्ज्ञ रिचर्ड कोर्सी यांनी वेगवेगळ्या परिस्थितीत श्वासोच्छ्वासाद्वारे व्यक्तीच्या शरीरात जाणारे एअरोसोल मोजण्यासाठी स्वतःचे मॉडेल विकसित केले. त्यांना आढळले की, एखाद्या संसर्गबाधितासह २० मिनिटे कारमध्ये बसणे शाळेच्या वर्गात किंवा रेस्टॉरंटमध्ये एखाद्या संसर्गबाधिताबरोबर एक तास बसण्यापेक्षा धोकादायक आहे. कारण कारमध्ये हवा बाहेर पडण्यासाठी पुरेशी जागा नसते.

अर्ध्या खिडक्यांतूनही पूर्ण उघडण्याइतका होतो फायदा
पाठपुराव्याच्या अभ्यासात असेही दिसून आले की कारच्या चारही खिडक्या अर्ध्याही उघडल्या गेल्या तर त्याचा त्या पूर्ण उघडण्याइतकाच परिणाम होतो. मथाई यांच्या मते, कमीत कमी दोन उलट दिशांच्या खिडक्या उघडल्या गेल्या तर कोरोना संसर्गाचा धोका कमी होऊ शकतो.

चारही खिडक्या बंद असल्यास कारमध्ये सर्वाधिक धोका
एअरोसोलची हालचाल जाणून घेण्यासाठी संशोधकांनी कारच्या आतला एअरफ्लो मोजला. यासाठी कारच्या खिडक्या वेगवेगळ्या प्रकारे उघडल्या व बंद केल्या. सर्व चार खिडक्या बंद केल्यावर हवेचा प्रवाह सर्वात कमी असल्याचे त्यांना आढळले. या परिस्थितीत संसर्गाचा धोका सर्वाधिक असतो.

कारमध्ये ड्रायव्हरचे सीट आणि मागील बाजूला क्रॉस खिडकी खुली ठेवल्यास संसर्गाची शक्यता कमी होते. ड्रायव्हर आणि मागील सीटवर क्रॉसमध्ये एकच व्यक्ती बसल्यासही धोका कमी होतो.

संशोधकांनी ताशी ५० मैल वेगाने चालणाऱ्या एका कारचा अभ्यास केला. यात पुढच्या बाजूस उजवीकडे चालक आणि मागील सीटवर डावीकडे एक प्रवासी बसला होता. अशा प्रकारे कारमध्ये जास्तीत जास्त शारीरिक अंतर राखले गेले. त्यात आढळले की चालत्या कारच्या बाहेरची हवा कारच्या आत एक दबाव निर्माण करते. मागच्यापेक्षा हवेचा दाब पुढच्या बाजूला कमी असतो. हवा मागून पुढच्या बाजूला फिरत असते.

बातम्या आणखी आहेत...