आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केस वाढवणारे 6 तेल:तुमच्यासाठी कोणते हेअर ऑइल आहे योग्य घ्या जाणून; तज्ञांचे मत काय

18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केसांना फक्त तेल लावणे पुरेसे नाही. केसांच्या टेक्सचर नूसार योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने तेल लावल्यास त्याचा फायदा होतो. ब्यूटी एक्सपर्ट शहनाज हुसैन सांगता आहेत, नारळ, तीळ, बदाम, सूर्यफूल आणि एरंडेल तेलाचे फायदे आणि ते केसांना लावण्याची योग्य पद्धत.

बदाम तेल

बदाम तेल कोरड्या आणि खराब केसांसाठी फायदेशीर आहे. व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम, ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड इत्यादींनी युक्त बदाम तेल केसांसाठी पोषक मानले जाते. हे केसांना मजबूत करते आणि केसांची चमक वाढवते. केमिकल बेस्ड हेअर कलर आणि लोशनचा वारंवार वापर केल्याने केस खराब होतात. अशा केसांना बदामाचे तेल लावल्याने केसांची चमक पुन्हा येऊ शकते. बदामाच्या तेलामध्ये लिनोलिक अ‍ॅसिड असते, जे केसांना पोषण आणि मॉइश्चरायझ करण्यास मदत करते. कोरड्या आणि खराब झालेल्या केसांना शॅम्पू करण्यापूर्वी रात्री बदामाचे तेल गरम करुन लावा.

खोबरेल तेल

आपल्याकडे खोबरेल तेलाला अधिक प्राधान्य दिले जाते. जास्त करून लोक केसांना खोबरेल लावतात. खोबरेल तेल केसांना मऊ, निरोगी आणि चमकदार बनवते, म्हणून ते केसांसाठी पौष्टिक मानले जाते. खोबरेल तेलाचा केसांना हलकासा मसाज केल्याने केसांच्या कूपांमध्ये रक्ताभिसरण वाढते आणि केस मऊ होतात. हे फॉलिकल्समध्ये रक्त परिसंचरण गतिमान करण्यास मदत करते. हे तेल केसांना रात्रभर राहू द्या. दुसऱ्या दिवशी सौम्य हर्बल शैम्पूने केस धुवा. केसांना आठवड्यातून दोनदा कोमट खोबरेल तेल लावा. नंतर टॉवेल गरम पाण्यात बुडवून पाणी पिळून गरम टॉवेल डोक्याला पगडीसारखा गुंडाळा. 5 मिनिटे तसेच राहू द्या. गरम टॉवेल गुंडाळण्याची ही प्रक्रिया 3 ते 4 वेळा पुन्हा करा. यामुळे तेल केसांना चांगल्या प्रकारे शोषून घेतात.

मसाज करताना केस जास्त घासू नका, फक्त बोटांच्या टोकांनी टाळूला हलक्या हाताने मसाज करा.
मसाज करताना केस जास्त घासू नका, फक्त बोटांच्या टोकांनी टाळूला हलक्या हाताने मसाज करा.

एरंडेल तेल

कोरड्या आणि खराब झालेल्या केसांसाठी एरंडेल तेल खूप फायदेशीर आहे. हे तेल घट्ट व चिकट असते, त्यामुळे तेल लावल्यानंतर केस चांगले शॅम्पू करून पाण्याने चांगले धुवावेत, त्यामुळे टाळू तेलकट राहत नाही. केस खूप कोरडे असल्यास एक चमचा एरंडेल तेलात एक चमचा खोबरेल तेल मिसळा. ते गरम करा व केसांवर आणि टाळुंवर लावा. तेल लावल्यानंतर हातांनी डोक्याला मसाज कारा. तसेत केसांना लावलेले तेल रात्रभर राहू द्या आणि दुसऱ्या दिवशी हर्बल शैम्पूने केस स्वच्छ धुवा.

तीळाचे तेल

तीळ केसांसाठीही खूप फायदेशीर असतात कारण त्यात भरपूर पोषक असतात. हे तेल केसांना आणि टाळूला लावल्याने कोंडा व बुरशीजन्य संसर्गासारख्या समस्यांपासून दूर ठेवण्यास मदत करते. हे तेल लावल्याने केसांची वाढ होते आणि केस गळणेही थांबते. रंगीत केसांना गरम केलेले तिळाचे तेल लावल्याने त्यांची गेलेली चमक परत येते. हे केसांचे पोषण करते आणि त्यांना मऊ बनवते. तीळीच्या तेलाने दुतोंडी केस येत नाही व हे तेल लावल्याने केसांना चमक येते.

आयुर्वेदिक भृंगराज तेल केसांसाठी खूप फायदेशीर मानले जाते.
आयुर्वेदिक भृंगराज तेल केसांसाठी खूप फायदेशीर मानले जाते.

भृंगराज तेल

भृंगराज ही आयुर्वेदाने मान्यता दिलेल्या औषधी वनस्पतींपैकी एक आहे. केस वाढवण्यासोबतच त्यांना मुळांपासून मजबूत करते. तीळ, खोबरे, आवळा, ब्राह्मी इत्यादी कोणत्याही तेलात भृंगराज तेल मिसळून लावल्यास अधिक फायदा होतो.

जोजोबा तेल

केसांमध्ये कोंडा होत असेल आणि केस जास्त गळत असतील तर जोजोबा तेल लावा. हिवाळ्यात केसांमध्ये कोंडा होतो, अशा परिस्थितीत जोजोबा तेल लावल्याने कोंडापासून आराम मिळतो. जोजोबा तेल कोरड्या टाळूवर लावल्यानेही फायदा होतो. हे तेल हलक्या हातांनी मसाज करून लावा आणि तासाभरानंतर केस स्वच्छ धुवा.

बातम्या आणखी आहेत...