आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जास्त जगतात चहा पिणारे लोक:मित्रांची कमतरता तुम्हाला आजारी पाडू शकते; उत्तम आरोग्यासाठी भरपूर मित्र बनवा, वाचा हेल्थ ब्रीफ

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नमस्कार,

तुम्हाला तुमच्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्यायची असेल तर, आम्ही तुमच्यासाठी 'वीकली हेल्थ ब्रीफ' घेऊन आलो आहोत. यामध्ये तुम्हाला आरोग्याविषयी अपडेट्स, रिसर्चशी संबंधित महत्त्वाची माहिती मिळेल. व यामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबाची चांगली काळजी घेऊ शकाल.

1.जास्त जगतात चहा पिणारे लोक, अमेरिकेतील संशोधनात दावा

जर तुम्ही दररोज दोन कप चहा प्यायले तर तुमचे आयुष्य 10 ते 12% वाढू शकते. असे अमेरिकेच्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे शास्त्रज्ञ सांगतात. 14 वर्षांपर्यंत 5 लाखांहून अधिक लोकांच्या अभ्यास केल्यानंतर, संशोधकांना असे आढळले की, जे लोक चहा पितात त्यांचे आयुष्य जे लोक चहा घेत नाहीत त्यांच्यापेक्षा जास्त असते.

पण, आरोग्य तज्ज्ञ अधिक चहा पिण्याबद्दल सावधगिरी बाळगत आहेत. चहामध्ये असलेल्या कॅलरी, साखर आणि कॅफिनचाही आरोग्यावर वाईट परिणाम होतो.

2. मित्र नसेल तर आजारी पडाल, निरोगी राहण्यासाठी भरपूर मित्र बनवा

जर तुम्हाला निरोगी आयुष्य जगायचे असेल, तर तुमला फ्रेंड सर्कल जास्त हवा. अमेरिकन लाइफवरील AEI सर्वेक्षण केंद्राने केलेल्या अभ्यासात असे आढळून आले आहे की, एकाकीपणामुळे अमेरिकन तरुणांची प्रतिकारशक्ती कमकुवत होत आहे. यासोबतच ते बीपी, शुगर, कॅन्सरसारख्या आजारांनाही बळी पडत आहेत. एकाकीपणामुळे तरुणांना हिंसेचा विचार येतो, असेही या अभ्यासात आढळून आले आहे. या अभ्यासात असे कारण समोर आले की, अधिक मित्र असलेले तरुण निरोगी राहतात.

3. मोबाईलचा लाईट चेहऱ्यावरील सुरकुत्या वाढवतो

मोबाईलचा अतिवापर डोळ्यांसाठी आणि मानसिक आरोग्यासाठी व सौंदर्यासाठी घातक आहे. मोबाईलच्या निळ्या लाईटमुळे अकाली वृद्धत्व देखील येऊ शकते. अमेरिकेच्या ओरेगॉन स्टेट युनिव्हर्सिटीच्या फ्रंटियर्स इन एजिंग या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, मोबाईलचा लाईट हा चेहऱ्यावरील सुरकुत्या वाढवतो. त्यामुळे लोक त्यांच्या खऱ्या वयापेक्षा जास्त वयस्कर दिसू लागतात.

4.वयाच्या चाळीशी नंतर हार्ड वर्क आऊट करू नका, हृदयावर होईल परिणाम

जिममध्ये जास्त वर्क आऊट करुन घाम घाळणे आरोग्यासाठी चांगले असते. पण याआधी राजू श्रीवास्तवसह अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींना जिममध्ये वर्कआऊट करताना हृदयविकाराचा झटका आला होता. एका संशोधनात असेही म्हटले आहे की, वयाच्या चाळीशी नंतर हार्ड वर्क आऊट केल्याने हृदयाचे नुकसान होऊ शकते. यूएस डिपार्टमेंट ऑफ हेल्थ अँड ह्युमन सर्व्हिसेसच्या अभ्यासात असे आढळून आले आहे की, 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये जास्त व्यायाम करणाऱ्यांमध्ये अधिक सीएसी होते. आम्ही तुम्हाला सांगतो की, सीएसी कॅल्शियमयुक्त प्लाक आहे, ज्यामुळे हृदयाशी संबंधित आजार होण्याची शक्यता वाढते.

5. वायू प्रदूषण महिलांसाठी अधिक धोकादायक, पुरुषांवर कमी परिणाम

एकाच प्रदूषित हवेत श्वास घेतल्याने पुरुष आणि महिलांवर वेगवेगळे परिणाम होतात. एका नव्या संशोधनातून हे समोर आले आहे की, प्रदुषण हे पुरुषांपेक्षा महिलांसाठी जास्त धोकादायक आहे. युरोपियन रेस्पिरेटरी सोसायटी इंटरनॅशनल काँग्रेसमध्ये सादर केलेल्या या संशोधनानुसार, पीएम 2.5 आणि पीएम 10 सारख्या प्रदूषणाच्या कणांमुळे महिलांना जास्त नुकसान होते.

बातम्या आणखी आहेत...