आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lifestyle
  • Health
  • Lack Of Sleep Weakens The Immune System; The Risk Of Diseases Like Heart Disease, Diabetes And Cancer Increases

अपूर्ण झोप:कमी झोपेमुळे रोगप्रतिकारक शक्ती घटते; हृदयरोग, मधुमेह व कर्करोगासारख्या आजारांचा धोका वाढतो

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

४० लाखांपैकी केवळ एका व्यक्तीमध्ये निर्धारित मानकापेक्षा निम्मी झोप घेऊनही निरोगी राहणारे जीन्स असतात. बहुतांश लोक ६-७ तासांपेक्षा कमी झोप घेत असतील तर केवळ रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होत नाही, तर कर्करोगासह अनेक आजारांचा धोकाही वाढतो. दर आठवड्याला रोज दोन तास कमी झोप घेतल्याने एखादी व्यक्ती प्री-डायबिटिक होऊ शकते. एवढेच नाही, तर झोपेची कमतरता धमन्या ब्लाॅक करू शकते, त्यामुळे हृदयरोग, स्ट्रोक आणि हार्टफेलचा धोका वाढतो. ज्यांना पुरेशी झोप मिळत नाही त्यांना चिंता, नैराश्याचा धोका जास्त असतो. एवढेच नाही, तर अशा व्यक्तीच्या मनात आत्महत्येचे विचारही जास्त येतात.

कर्करोग : बाउल कॅन्सरचा धोका ५०%पर्यंत अधिक झोपेच्या कमतरतेमुळे डीएनएचे नुकसान होते. यामुळे अनेक आवश्यक हार्मोन्सचे उत्पादन कमी होते. पेशींचा नाश आणि निर्मिती प्रक्रिया वाढते. या आनुवंशिक बदलांमुळे कर्करोगाच्या गाठींचा धोका वाढतो. ओहायो युनिव्हर्सिटीच्या मते, जे लोक ६ तासांपेक्षा कमी झोपतात त्यांना आतड्याच्या कर्करोगाचा धोका ५० टक्के जास्त असतो.

हार्ट अॅटॅक : पंचेचाळिशीनंतर हृदयविकाराचा २००% धोका मध्यम वयात रात्री दोन तास कमी झोप घेत असाल तर हृदयाचे आकुंचन दर तासाला वाढू लागते. रक्तदाबदेखील वाढतो, त्यामुळे हृदयावर ताण वाढतो. कमी झोपेमुळे ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या रक्तवाहिन्यांचे नुकसान होते. या स्थितीत ४५ वर्षांवरील लोकांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका २०० टक्के जास्त असतो.

जाणून घ्या किती गंभीर आजारांचे कारण आहे कमी झोप कमी झोपेच्याचाचणीचे सूत्र सकाळी १० ते ११ दरम्यान झोप आली तर समजा, तुमची झोप खूप कमी आहे.

मधुमेह : केवळ पाच रात्री अनियमित झोप घेतल्याने साखर नियंत्रित करण्याची क्षमता कमी होऊ लागते झोपेच्या कमतरतेमुळे इन्सुलिनची प्रतिकारशक्ती, तणाव संप्रेरक कॉर्टिसोल आणि जळजळ वाढते. तिन्ही मिळून रक्तातील साखरेवर परिणाम करतात. २००७ मध्ये शिकागो विद्यापीठाने काही महिला आणि पुरुषांवर संशोधन केले होते. त्यांना ५ रात्री अनियमित झोपू देण्यात आले. यानंतर ग्लुकोजचे इंजेक्शन देऊन त्यावर नियंत्रण ठेवण्याची क्षमता मोजली गेली. जे लोक नियमित झोपतात त्यांच्यापेक्षा त्यांच्यामध्ये साखरेचे प्रमाण २३ टक्क्यांपर्यंत जास्त असल्याचे आढळून आले. अपुरी झोप किंवा गाढ झोप न मिळाल्याने मेटाबॉलिझमवर वाईट परिणाम होत असल्याचे एका संशोधनात आढळून आले आहे. यामुळे लठ्ठपणा येतो, ते मधुमेहाचे मुख्य कारण आहे.

कमकुवत इम्युनिटी : नैसर्गिक किलर पेशी ७०%पर्यंत घटतात झोपेच्या कमतरतेमुळे शरीरातील टी-सेल्स आणि अँटिबॉडीजचे उत्पादन कमी होते. संसर्गाशी लढण्यासाठी या दोघांनीही मजबूत असणे फार महत्त्वाचे आहे. एका संशोधनात आढळून आले की, ज्या लोकांना पुरेशी झोप मिळत नाही त्यांच्यातील महत्त्वाच्या रोगप्रतिकारक पेशी ‘नैसर्गिक किलर्स’ ७० टक्क्यांपर्यंत कमी होतात, त्यामुळे संसर्गाचा धोका वाढतो.

स्मृतिभ्रंश : कमी झोपेमुळे मेंदू काढू शकत नाही बीटा अॅमेलाॅइड झोप पूर्ण न झाल्यास मेंदूला बीटा अॅमेलाॅइड किंवा इतर प्लेक काढण्याची संधी मिळत नाही. अॅमेलाॅइड बीटा प्रोटीनमुळे मेंदूच्या एका विशिष्ट भागात टॉक्सिन तयार होऊ लागतात, त्यामुळे स्मरणशक्ती कमी होऊ लागते. सतत झोप न मिळाल्याने मेंदूतील या पदार्थांचे प्रमाण वाढते, त्याचा थेट परिणाम स्मरणशक्तीवर होतो.

डॉ. बी. पी. सिंह एमबीबीएस, एमडी,डीएनबी प्रिन्सिपल कन्सल्टंट, मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल

बातम्या आणखी आहेत...