आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lifestyle
  • Health
  • Balance Test For Elderly I If You Cant Stand On One Leg For 10 Seconds I Your Chances Of Dying In The Next 10 Years Will Double

बॅलन्स टेस्टमधून कळेल तुमचे आयुष्य:तुम्ही एका पायावर 10 सेकंद उभे राहू शकत नसाल; तर सावधान, 10 वर्षांत मृत्यूची शक्यता दुप्पट

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चांगले आणि दीर्घायुष्य जगण्यासाठी केवळ मानसिकच नाही तर शारीरिकदृष्ट्याही समतोल असणे आवश्यक आहे. ब्राझीलमध्ये नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार, 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना एका पायावर 10 सेकंदांपेक्षा जास्त वेळ उभे राहता येत नसेल, तर पुढील 10 वर्षांत त्यांचा मृत्यू होण्याची शक्यता दुप्पट होते.

दहा वर्ष बॅलन्स टेस्टचा प्रयोग केला गेला

  • शास्त्रज्ञांना संशोधनातून हे सिद्ध करायचे होते की, खरच 10 सेकंदाच्या बॅलन्स टेस्टमधून नागरिकांच्या मृत्यूचा अंदाज लावता येईल का? तसेच ही चाचणी रुग्णांच्या नियमित आरोग्य तपासणीमध्ये जोडली जावी. यासाठी 1,700 लोकांवर हे संशोधन केले गेले. 2009 ते 2020 या कालावधीत त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. पहिल्या कसोटीच्या वेळी, त्याचे वय 51 ते 75 वर्षे होते. ज्यामुळे सरासरी वय 61 वर आले. त्यापैकी 68% पुरुष होते.
  • 10 वर्षांच्या संशोधनात, 21% लोक बॅलन्स टेस्टमध्ये नापास झाले. याशिवाय वयोमानानुसार चाचणीत नापास होण्याचा धोकाही वाढतो. 71 ते 75 वर्षे वयोगटातील 54 % लोक ही चाचणी उत्तीर्ण होऊ शकले नाहीत. त्याचवेळी, 51 ते 55 वयोगटातील 5 टक्के व 56 ते 60 वर्षे वयोगटातील 8 %, 61 ते 65 वर्षे वयोगटातील 18 % आणि 66 ते 70 वयोगटातील 37 % लोक चाचणीत अनुत्तीर्ण झाले.

संशोधनातून काय साध्य झाले

10 वर्षांच्या संशोधनात, शास्त्रज्ञांना असे आढळले की. जे लोक बॅलन्स टेस्टमध्ये अयशस्वी झाले. त्यांचा लवकर मृत्यू होण्याची शक्यता जास्त आहे. अयशस्वी झालेल्यांपैकी सुमारे 17.5% लोकांनी पुढील 10 वर्षांत आपले जीवन गमावले. त्याचवेळी, उत्तीर्ण झालेल्यांमध्ये हा आकडा 4.6 टक्के होता. शास्त्रज्ञांना असेही आढळून आले की, जे समतोल चाचणीत अपयशी ठरले. त्यांना लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, कोरोनरी आर्टरी डिसीज आणि डिस्लिपिडेमियासारखे आजार होते.

मृत्यूचा धोका 84 टक्क्यांनी वाढला

संशोधनादरम्यान, मृत्यू झालेल्या लोकांचे लिंग, वय आणि वैद्यकीय इतिहास विचारात घेण्यात आला. यामुळे शास्त्रज्ञांना हे समजले की जे लोक वृद्धापकाळाने आणि इतर आजारांनी ग्रस्त आहेत आणि समतोल चाचणीत अपयशी अपयशी ठरतात. त्यांना पुढील 10 वर्षांमध्ये मृत्यूचा धोका 84 टक्के आहे.

समतोल (बॅलन्स) चाचणी कशी केली जाते?

बॅलन्स चाचणी घरी देखील सहज करता येते. तुम्ही कोणत्याही एका पायावर 10 सेकंद उभे रहा. उभा पाय मागे ठेवा. दोन्ही हात बाजूला ठेवा. चाचणी दरम्यान 2 मीटर अंतरावर डोळ्याची पातळी पहा. चाचणी करण्यासाठी तीन प्रयत्न करा.

बातम्या आणखी आहेत...