आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:एकाच वेळी अनेक कामे करणे, जास्त गोड खाणे, मेकअपची सवय माणसाला लवकर वृद्ध करतेय

सेक्रामँटो9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधकांच्या मते दैनंदिन आठ सवयींना वाईट

सामान्यपणे कोणत्या सवयींमुळे आपण वृद्धापकाळाला जवळ बोलावतोय, याची आपल्याला जाणीव नसते. मात्र नियंत्रित करता येणाऱ्या अनेक सवयी असतात. एकाचवेळी अनेक कामे करणे, धूम्रपान, जास्त गोड सेवन, कमी झोप, दीर्घकाळ बैठक इत्यादी सवयींमुळे माणसाला १० ते १३ वर्षे आधीच म्हातारपण येत आहे. संशोधकांनी दररोजच्या आठ सवयींबद्दल इशारा दिला आहे. त्यामुळे सावध होण्याची वेळ आहे.

फास्टफूडमुळे वय ६ वर्षे कमी : फास्टफूड फॅट वाढवते. अनेक त्रासही वाढू शकतात. सोबतच माणसाचे वय सहा वर्षाने कमी होण्याचीही शक्यता असते.

गोड खाल्ल्याने त्वचेचा कठोरता : जास्त गोड खाल्ल्याने वजन वाढते. वय घटते. साखरेमुळे त्वचेतील पेशी कडक व अनियमित होतात.

जास्त सुरकुत्या पडणे : जास्त सुगंध, रासायनिक कारखान्यांत अल्कोहोल जास्त असते. त्यामुळे त्वचेला खाज येते. त्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या पडू लागतात.

मोठ्या आवाजात ऐकणे हानिकारक : मोठ्या आवाजात संगीत ऐकणाऱ्यांना आता सावध झाले पाहिजे. कारण श्रवण शक्ती कमी-कमी होऊ शकते. हेडफोनवर मोठा आवाज हानिकारक आहे.

धूम्रपानामुळे व्हिटॅमिन सीच्या पातळीत घट : धुम्रपानामुळे त्वचा रखरखीत होते. चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात. शरीरातील व्हिटॅमिन सीची पातळी घटते. धुम्रपानामुळे वय १० वर्षे घटू शकते.

कमी झोप अयोग्य : रोज ७ तास झोप आवश्यक आहे. कमी झोपेमुळे मेंदू थकतो. वजन वाढते. या गोष्टी शरीरारासाठी घातक आहेत.

तासनतास कामाने वयात ८ वर्षे घट : एकाचवेळी अनेक कामे, तासनतास काम केल्याचा तणाव पडतो. वय ८ वर्षाने कमी होऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...