आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आरोग्य:लॉकडाऊनमध्ये गाणी ऐका, गप्पा मारा....

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आपण आजपर्यंत ज्या गोष्टी वेळेअभावी करू शकलो नाही त्या आता या लॉकडाऊन दरम्यान करता येतील

सध्या जी परिस्थिती आपल्यावर ओढावली आहे, ती खरोखरच वाईट आहे, परंतु अशा परिस्थितीतूनही मार्ग काढणे गरजेचे आहे. ही आपल्याला मिळालेली एक संधी आहे. आपण आजपर्यंत ज्या गोष्टी वेळेअभावी करू शकलो नाही त्या आता या लॉकडाऊन दरम्यान करता येतील. कुटुंबासोबत एकत्र राहता येईल.

सकारात्मक व्हा - आपल्या मनात नकारात्मक विचार येत असतील तर त्याकडे लक्ष न देता दुसऱ्या कामाकडे लक्ष वळवा. कारण ही चांगले विचार करण्यासाठी मिळालेली संधी आहे. न जाणो या लॉकडाऊनमुळे आपण नव्या उत्साहाने आणि जोमाने कामाला लागू.

कामाकडे लक्ष द्यावे - काही वेळा आपले मूड खराब असले की काहीही करावेसे वाटत नाही. असे करू नका. आपले मन आणि लक्ष कामाकडे केंद्रित करून आपला वेळ घालवा. कामाला प्राधान्य द्या.

मेडिटेशन करा - काम नसणे याचाही ताण येतोच कारण आपल्याला कामाची सवय झालेली आहे. यासाठी मेडिटेशन करून तणावांपासून मुक्ती मिळवू शकता. यासाठी तणावाच्या स्थितीमध्ये दीर्घ श्वसन करा. असे केल्याने आपण तणावापासून दूर राहतो आणि आरोग्य चांगले राहते.

विनोदी कार्यक्रमाला प्राधान्य द्या - सध्या काम नाही आणि अशा रिकाम्यावेळी काय करावे असा प्रश्न निमार्ण होतो आणि उदास वाटते तर या लॉकडाऊनमध्ये एखादा विनोदी कार्यक्रम किंवा चित्रपट बघितल्याने तुमचा मूड चांगला होऊन कामासाठी उत्साह येईल आणि नैराश्य दूर होईल.

गाणी म्हणा व ऐका - स्वतःला व्यस्त ठेवण्यासाठी आणि ताण तणाव दूर करण्यासाठी आपल्याला आवडेल ती गाणी म्हणा आणि ऐका आणि आनंद घ्या.

दुसऱ्यांशी संवाद साधा - सध्याच्या परिस्थितीत कुठेही जाता येत नाही. त्यामुळे मूड खराब होतो तर मित्रांना, नातेवाइकांना फोन करून, गप्पा मारून स्वतःला आनंदी ठेवा. अशावेळी एखाद्या गरजूला मदतीचा हात द्या. करून बघा आपल्याला चांगले वाटेल.

आवडते पदार्थ बनवा आणि खा - आपल्या पाककेलेसाठी ही लॉकडाऊनची संधी चांगली आहे. पोटाला शांत करण्यासाठी आपल्याला आवडेल ते पदार्थ बनवा आणि खा त्यामुळे आपले मन शांत होईल आणि आनंदही मिळेल.

नियमित व्यायाम करा - दररोज नियमित व्यायाम करणे फायदेशीर असते. जमेल तितका शारीरिक व्यायाम केल्याने मन शांत राहील आणि आरोग्यही सुधारेल.

विश्रांती घ्या - सततच्या कामामुळे विश्रांती घ्यायला कमी वेळ मिळायचा. आता पुरेशी झोप घ्या. विश्रांतीमुळे तुमचा मूड चांगला राहील आिण तुम्हाला फ्रेशही वाटेल.

बातम्या आणखी आहेत...