आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सांधेदुखी:दीर्घकाळ बैठे काम, फास्ट फूड व धूम्रपान हाडांसाठी हानिकारक, ही 4 योगासने प्रभावी

औरंगाबाद12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुढील दशकात संधिवात ही भारतातील चौथी मोठी समस्या असेल. याचे एक प्रमुख कारण म्हणजे सुमारे ९० टक्के भारतीय महिलांमध्ये हाडांच्या चयापचयासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या व्हिटॅमिन-डीची कमतरता आढळून येते. एवढेच नाही, तर वृद्धांसोबतच आता भारतीय तरुणांमध्येही हाडांसंबंधी समस्या वाढत आहेत. ५५ ते ६० वर्षे वयोगटातील सांधेदुखीशी निगडित केसेस आता ३५ ते ४० वर्षांपर्यंत पोहोचल्या आहेत. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे जीवनशैली आणि आहारातील झपाट्याने होणारा बदल. आहारात फळे आणि भाज्यांची जागा फास्ट फूड आणि कॅनमधील खाद्यपदार्थ घेत आहेत. त्यामुळे शरीराला आवश्यक पोषक द्रव्ये मिळत नाहीत. दुसरे कारण म्हणजे लोकांच्या शारीरिक हालचालींचा अभाव. त्यामुळे हाडांच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या ऊतींचे उत्पादन कमी होत आहे. लोकांमधील तणावही झपाट्याने वाढला आहे. खरं तर, सततच्या तणावामुळे कॉर्टिसोल हार्मोन वाढू लागते. यामुळे रक्तातील साखर वाढते, त्यामुळे कॅल्शियम लघवीद्वारे शरीरातून बाहेर पडू लागते.

जीवनशैलीसंबंधी सवयींमुळे असे होते हाडांचे नुकसान
धूम्रपान : तंबाखूचा धूर फ्री रॅडिकल्स सोडतो. हे फ्री रॅडिकल्स हाडे बनवणाऱ्या पेशी नष्ट करतात. याशिवाय धूम्रपान केल्याने कॅल्सिटोनिन हार्मोनची पातळी कमी होते. कॅल्सिटोनिन हाडांचा साठा संतुलित करण्यास मदत करते.

फास्ट फूड : अमेरिकेच्या सीडीसीनुसार, मैदा, शुद्ध साखर व शुद्ध तेलांचे पदार्थ शरीरातून पचनासाठी पोषक तत्त्वे घेतात. यामुळे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सची कमतरता निर्माण होते, त्यामुळे हाडे कमकुवत होऊ लागतात.

अपूर्ण झोप : कमी झोपेमुळे स्ट्रेस हार्मोन कार्टिसोलची पातळी वाढते. हे नियंत्रित करण्यासाठी शरीर हाडांमधून कॅल्शियम आणि खनिजे घेते. त्याचबरोबर कमी झोपेमुळे हाडे बनवणाऱ्या पेशींची निर्मितीही कमी होऊ लागते.

दीर्घ बैठक : खरं तर हाडे जिवंत ऊती आहेत. त्यांची नियमित घडमोड होते, परंतु तुटलेल्या ऊतींच्या तुलनेत नव्या ऊतींचे उत्पादन कमी होते तेव्हा हाडे कमकुवत होतात. जास्त वेळ बसल्यामुळे नवीन ऊतींची निर्मिती कमी होऊ लागते.

सोडा : फॉस्फरिक अॅसिड अनेक सोड्यामध्ये आढळते. आपण सोडा घेतो तेव्हा आपल्या हाडांना ते निष्प्रभ करण्यासाठी अल्कधर्मी कॅल्शियम सोडावे लागते. अशा स्थितीत अनेकदा सोडा घेतल्याने हाडे कमकुवत होऊ लागतात.

जास्त वजन : जास्त वजन किंवा लठ्ठपणामुळे हाडांचे नियमन करणाऱ्या हार्मोन्सवर परिणाम होतो. ऑक्सिडेटिव्ह तणाव वाढण्याव्यतिरिक्त हाडे तयार करणाऱ्या पेशींच्या चयापचयावर परिणाम होतो.

बातम्या आणखी आहेत...