आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हार्वर्डचे संशोधन:10 % वजन घटवणे व कडधान्ये खाल्ल्याने तयार होते चांगले कोलेस्टेरॉल

छत्रपती संभाजीनगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी योग्य असल्यास हृदयाशी संबंधित आजार, हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका कमी होतो. कोलेस्टेरॉलचे दोन प्रकार आहेत. प्रथम- एलडीएल किंवा वाईट कोलेस्टेरॉल. एलडीएल वाढल्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये प्लेक जमा होतो, यामुळे ब्लॉकेज होते, यामुळे हृदयविकाराचा झटका-स्ट्रोक इ.चा धोका असतो. दुसरे एचडीएल किंवा चांगले कोलेस्टेरॉल. पण, हे कोलेस्टेरॉल चांगले का आहे? हार्वर्डच्या टीएच चॅन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थचे प्रा. डॉ. फ्रँक सॅक्स यांच्या मते, चांगले कोलेस्टेरॉल रक्तवाहिन्यांतून रक्तप्रवाह व धमनीच्या भिंतींमधून अतिरिक्त कोलेस्टेरॉल गोळा करून यकृतापर्यंत पोहोचवते, तिथे ते शरीरातून काढून टाकले जाते. या प्रक्रियेमुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो. वैद्यकीय मार्गदर्शक तत्त्वांनुसार, तरुणांमध्ये याचे प्रमाण ४० ते ६० मिग्रा/डीएल असावे. विशेष म्हणजे शरीरात हे जास्त असल्यास कोणताही फायदा होत नाही.

या पद्धतींंनी संतुलित ठेवता येते चांगले कोलेस्टेरॉल वजन : वेब एमडीच्या मते, तुमचे वजन जास्त असल्यास ते ५ ते १० टक्के कमी करा. किंवा लठ्ठ व्यक्तीने त्याचे वजन ५ ते १०% कमी केले तर त्याचे चांगले कोलेस्टेरॉल ५ पॉइंट्सने वाढू शकते.

ब्रिस्क वॉक : आठवड्यातून तीनदा ३० मिनिटांसाठी ब्रिस्क वॉक केले तर एचडीएलचे प्रमाण म्हणजेच चांगले कोलेस्टेरॉल संतुलित ठेवता येते, पण ते वाढवताही येते.

फास्ट फूड : आहारातील फास्ट फूड व शुद्ध कार्बोहायड्रेट्स घटवून कडधान्ये घेतल्यास रक्तातील चांगल्या कोलेस्टेरॉल वाढवता येते.

धूम्रपान सोडा : धूम्रपान व मद्य दोन्ही वाईट कोलेस्टेरॉल वाढवतात. त्यांच्यापासून दूर राहणे हा सर्वात प्रभावी उपाय आहे.