आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आरोग्य:भूक मंदावणे आणि अचानक वजन घटणे ही कर्करोगाची लक्षणे असू शकतात

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
२०१४ मध्ये गेर्डी मॅक्केना यांना स्तनाचा कर्करोग झाल्यानंतर किमोथेरपीमुळे त्यांचे केस गळाले. त्यांना मानसिक बळ देण्यासाठी त्यांच्या ११ मित्रांनीही मुंडण केले. - Divya Marathi
२०१४ मध्ये गेर्डी मॅक्केना यांना स्तनाचा कर्करोग झाल्यानंतर किमोथेरपीमुळे त्यांचे केस गळाले. त्यांना मानसिक बळ देण्यासाठी त्यांच्या ११ मित्रांनीही मुंडण केले.
  • कर्करोग टाळण्यासाठी हे सात खबरदारीचे उपाय

जगभरात होणाऱ्या एकूण मृत्यूंचे कर्करोग हे सर्वात मोठे दुसरे कारण आहे, त्यामुळे कर्करोगाविषयी जागरूकता होणे आवश्यक आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, २०१८ मध्ये जगभरातून १.८१ कोटी केसेस समोर आल्या आहेत तर ९६ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. जर भारताचा विचार केला तर इथे जवळपास ११.५ लाख लोकांना कर्करोग होतो. गंभीर गोष्ट म्हणजे विकसित देशांच्या तुलनेत इथे कर्करोग रुग्णांचा मृत्युदर दुप्पट आहे. ग्लोबल ऑन्कोलॉजीच्या अहवालानुसार २०२० मध्ये भारतात प्रत्येक एक लाख पुरुषांमध्ये ९४ आणि एक लाख महिलांमध्ये प्रत्येकी १०३.६ महिलांना कर्करोग होतो. कर्करोगाने होणाऱ्या जवळजवळ एकतृतीयांश मृत्यूंसाठी ५ मुख्य कारणे जबाबदार आहेत. यामध्ये लठ्ठपणा, भाजीपाला आणि फळांचे आहारात सेवन न करणे, तंबाखू आणि मद्यपान करणे. कर्करोगाने होणाऱ्या एकूण मृत्यूंमध्ये २२ टक्के मृत्यू हे तंबाखूमुळे होतात. पुरुषांमध्ये फुप्फुसांचा कर्करोग तर महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग सर्वाधिक होतो.

कर्करोग टाळण्यासाठी हे सात खबरदारीचे उपाय
सतर्क व्हा जर ...
काही न करता वजन घटत असेल

खाणे-पिणे, दिनचर्या किंवा व्यायाम करण्याच्या पद्धतीत काही बदल न करता जर ४ किलोपेक्षा अधिक वजन घटले तर सतर्क व्हा. स्वादुपिंड, पोट, फुप्फुसांच्या कर्करोगात वजनात वेगाने घट होते.

अधिक थकवा जाणवत असेल
जर तुम्ही तणावात असाल आणि नेहमीपेक्षा जर अधिक थकवा जाणवत असेल तर तुम्ही डॉक्टरशी बोलून घ्या. थकवा हे ब्लड कॅन्सरचे सुरुवातीचे संकेत असू शकतात. प्रोस्टेट कर्करोगाच्या अॅडव्हान्स स्टेजमध्ये बराच थकवा जाणवतो.

सतत खोकला किंवा अंगदुखी होत असेल
तुम्हाला सतत खोकला किंवा छातीत दुखत असेल तर याकडे दुर्लक्ष करू नका. कारण हे फुप्फुसाच्या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे असू शकतात.
जर खोकला, लघवी, तोंड किंवा नाकातून सतत रक्त येत असेल तर सर्व्हायकल कॅन्सर असण्याची शक्यता असू शकते. जर पूर्ण शरीरात अनेक दिवस वेदना होत असतील आणि याचे कोणतेही प्रत्यक्ष कारण दिसत नसेल तर हे हाडांच्या किंवा स्वादुपिंडाच्या कर्करोगाचे प्रारंभिक लक्षण असू शकते.

शरीरावर डाग उठत असतील
शरीरावर मोठे आणि वेगवेगळ्या रंगाचे डाग दिसत असतील तर सर्तक व्हा. जर तोंड आल्यावर त्याचे व्रण दीर्घकाळापर्यंत राहिले असतील तर हे कर्करोगाचे लक्षण आहे. याशिवाय सतत लघवी करताना त्रास होत असेल तर हा प्रोस्टेटचा आकार वाढला असण्याची शक्यता आहे.

बचाव करण्यासाठी अशी घ्या काळजी...
कमरेची काळजी घ्या
- पुरुषांची कंबर ही ३७ इंच आणि महिलांची कंबर ही ३१.५ इंचांपेक्षा अधिक असू नये.

नियमित व्यायाम- रोज जवळजवळ ३० मिनिटे व्यायाम करणे गरजेचे आहे. १० ते १५ मिनिटांचे व्यायाम प्रकार दिवसातून दोन ते तीन वेळा करा. वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम करता येतील.

मिठावर नियंत्रण- अधिक प्रमाणात मीठ आणि सोडियम प्रोसेस्ड फूड टाळा. रोजच्या जेवणात मिठाचे प्रमाण २४०० मिलिग्रॅमपेक्षा अधिक असू नये.

डॉ. शेवंती लिमये
कन्सल्टंट मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट
एमबीबीएस, एमडी, एमएस (कोलंबिया युनिव्हर्सिटी)
कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट, मुंबई

बातम्या आणखी आहेत...