आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Lifestyle
  • Health
  • Make a mask at home keep three layers of cloth do not leave it loose and the part from nose to chin should be covered expert

मास्क गाइड :कपड्याचे मास्क वापरले तरी ते तीन आवरणाचे असावे; सिंगल लेअर मास्क किंवा रुमाल कोरोनाविरुद्ध प्रभावी नाही; प्रश्नोत्तरांमध्ये जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कॉटनचे तीन लेअर असलेले मास्क चांगले, सर्जिकल आणि तीन लेअरचे कापडी मास्क तेवढेच प्रभावी

जगभरातील तज्ज्ञांनी कोरोना व्हायरस विरोधात लस येत नाही तोपर्यंत काही उपाययोजना करून व्हायरसपासून स्वतःचे बचाव करण्याचा सल्ला दिला. त्यापैकीच एक आपल्या तोंड आणि नाकावर मास्क लावणे आहे. संशोधनात मास्कचे फायदे सुद्धा सांगण्यात आले. तरीही नेमके कोणते प्रकारचे मास्क सर्वात सुरक्षित आहेत यावर लोकांमध्ये अजुनही संभ्रम आहेत. तेच संभ्रम दूर करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना, आरोग्य तज्ज्ञ काय म्हणतात त्यांचे मत जाणून घेणे आवश्यक आहे.

हाँगकाँग विद्यापीठ आणि मेरीलँड विद्यापीठातील संशोधनात व्हायरसचा सामना करणाऱ्या लोकांना मास्क न लावता एका ट्युबमध्ये श्वास सोडण्यास सांगण्यात आले. त्यात श्वसनातून काही थेंबा आणि मायक्रो पार्टिकल हवेत 30 टक्के सोडले गेले. तर, मास्क घालून हे प्रयोग केले असता 100 टक्के संक्रमण थांबल्याचे दिसून आले.


जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले, मास्क लावणे आवश्यक

जागतिक आरोग्य संघटनेचे विशेष प्रतिनिधी डॉ. डेव्हिड नवारो यांच्या मते, जास्तीत जास्त लोकांना मी मास्क लावण्याचे समर्थन करतो. कारण व्हायरस कुणावरही हल्ला करू शकतो. स्थानिक पातळीवरच आपण मास्क बनवण्यात आणि ते लोकांना वापरण्यासाठी प्रोत्साहित करू शकलो तर संक्रमण थांबवण्यात मदत मिळू शकते. मास्क लावण्यासोबतच लोकांनी खोकलण्याची पद्धत सुद्धा शिकायला हवी. खोकलताना कपड्याचा वापर करावा. वेळोवेळी हात धूत राहावे. यातून व्हायरसपासून वाचता येऊ शकते.


सरकारने दिला होता घरात मास्क बनवण्याचा सल्ला

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकांना घरातच मास्क तयार करून चेहरा झाकण्याचा सल्ला दिला होता. सरकारी निर्देशांमध्ये सुद्धा घरात बनवलेले मास्क घालून संक्रमणापासून वाचता येईल असे सांगण्यात आले होते. घरातून निघताना लोकांनी कपड्याचे मास्क तरी घालावे असा सल्ला देण्यात आला होता. एवढेच नव्हे, तर केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांनी सुद्धा कपड्याचे मास्क घरातच तयार करण्याचे आवाहन करताना एक व्हिडिओ जारी केला होता.


प्रश्नोत्तरेः कपड्याचे मास्क कसे असायला हवे. कुठल्या चुका टाळाव्या आणि काय लक्षात ठेवावे. अशा काही महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे एम्स भोपालच्या विभाग प्रमुख डॉ. नीलकमल कपूर यांनी दिली आहेत.


Q1) रुमाल किंवा घरात बनवलेले कपड्याचे मास्क किती सुरक्षित?

नाक आणि तोंड झाकण्यासाठी जो कपडा वापरला जातो तो सिंगल लेअर असू नये. जर रुमाल वापरत असाल तर ते डोळ्यांखाली अशा पद्धतीने बांधावे की त्याच्या तीन लेअर तुम्हाला हनुवटीपर्यंत लावता येतील. यातून व्हायरसपासून चांगल्या प्रकारे वाचता येऊ शकेल. सिंगल लेअर रुमाल वापरू नये.


Q2) फॅशनेबल मास्क संक्रमणापासून कितपत वाचवतात?

मास्क कुठलाही प्रकारचा असो तो तीन लेअरचा पाहिजे. नाक आणि तोंडाला झाकताना सर्व बाजूंनी टाइट असावे. जेणेकरून हवेतून पसरणारे संक्रमणाचे कण मास्कमध्ये जाऊ नये.


Q3) मास्क लावणारे लोक कोणत्या चुका करतात?

मास्क लावताना लोक त्याचे लेस ताठ बांधत नाहीत. अनेकदा वरची पट्टी बांधली तरी खालची मोकळी सोडून दिली जाते. काही लोकांचे मास्क तर वारंवार नाकावरून घसरत राहते. तर काही लोक ते मुद्दाम नाकावरून खाली ओढतात. असे करू नका. यातून संक्रमणाचा धोका वाढतो. कुठेही राहा, ऑफिस किंवा घराबाहेर बाजारात असताना नेहमीच मास्क लावून ठेवा. मास्क काढल्यानंतर हाथ धुतल्याशिवाय नाक किंवा तोंडाला स्पर्श करू नका.


Q4) होममेड मास्कमध्ये कशा प्रकारचा कापड वापरावा?

एखाद्या विशिष्ट कपड्यावर काहीच गाइडलाइन जारी करण्यात आलेले नाहीत. तरीही कॉटनचे कापड चांगले ठरेल. याच्या तीन लेअरने एक मास्क तयार केले जाऊ शकते. यातून संक्रमणापासून संरक्षण मिळेल. सोबतच, श्वास घेण्यातही त्रास होणार नाही.


Q5) मास्क कसे असावे?

हनुवटीपासून डोळ्यांच्या खालच्या भागापर्यंत झाकणारे मास्क वापरावे. मास्क ढिले असू नये. आरोग्य कर्मचाऱ्यांकरिता विविध प्रकारचे मास्क असू शकतात. परंतु, सामान्य लोकांसाठी तीन लेअर असलेले कुठलेही मास्क वापरता येऊ शकते. प्रत्येकाकडे 2 ते 3 मास्क असायला हवे. हे मास्क रोज साबणाने धुवून आणि उन्हात वाळवून पुन्हा वापरता येईल.


Q6)  कोणते मास्क चांगले, सर्जिकल की कपड्याचे?

सर्जिकल मास्कच्या तुलनेत कपड्याच्या मास्कमध्ये अधिक छिद्र असतात. त्यामुळे, सर्जिकल मास्क अधिक चांगले ठरू शकतात. ते उपलब्ध नसल्यास तीन लेअर असलेले कपड्याचे मास्क वापरावे. दोन्ही प्रकारचे मास्क व्हायरस रोखण्यात प्रभावी ठरतात.

0