आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Lifestyle
 • Health
 • Make Sure To Take Medicines In Navratri And Ramzan, Some Measures That Will Keep You Energetic | Marathi News

कामाची बातमी:नवरात्री आणि रमजानमध्ये अशाप्रकारे घेऊ शकता औषधी, काही उपाय जे तुम्हाला उपवासातही ठेवतील एनर्जेटिक

4 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक

आज चैत्र नवरात्रीचा पहिला दिवस आहे. उद्या म्हणजेच ३ एप्रिलपासून रमजान महिना सुरू होणार आहे. मुस्लिम बांधव रोजा ठेवतील. यावर्षी उष्णता जास्त आहे. अशा स्थितीत उपवास आणि रोजे करणाऱ्यांनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. जे लोक नियमित रक्तदाब (बीपी), शुगर, थायरॉईड इत्यादींसाठी औषधे घेतात, त्यांनी ती घेणे थांबवू नये.

या सर्व गोष्टी आपल्या सर्वांना माहीत आहेत. असे असूनही काहीजण आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. हे देखील लक्षात ठेवा की उपवासाचे काही नियम आहेत, जे पाळले पाहिजेत.

उपवास आरोग्यासाठी चांगला मानला जातो. कारण हा पचनसंस्थेला आराम देतो आणि शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करतो.

उपवास करण्यामागील कारण सांगत आहेत श्री श्री रविशंकर
जेव्हा आपण धर्म आणि श्रद्धा याबद्दल बोलतो तेव्हा त्यावर विज्ञान लागू होत नाही. असे असूनही, आपण एकदा श्री श्री रविशंकर यांचा मुद्दा विचारात घेतला पाहिजे.

ते सांगतात- उपवास फक्त धार्मिक प्रसंगीच केला पाहिजे असे नाही. शरीर आतून स्वच्छ करण्यासाठीही उपवास आवश्यक आहे. यामुळे पचनक्रिया सुधारते. मनही निरोगी राहते. नैराश्य आणि मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या सोडवण्यास मदत होते. म्हणूनच आपल्या धर्मग्रंथात उपवासाला धर्माशी जोडले गेले आहे. उपवास केल्याने मेंदूला विश्रांती मिळते असे म्हणतात. आजकाल लोक उपवासाच्या नावाखाली तळलेले पदार्थ खातात. हे करणे टाळा.

आता तुम्ही विचार करत असाल की विज्ञानानुसार उपवास कसा करता येईल? त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवा-

 • ज्यूस आणि पाण्यासोबत काही फळे खाऊ शकता. यामुळे शरीरात एन्झाइम तयार होते आणि अन्न सहज पचते.
 • उपवासाच्या दिवशी रात्री उशिरा अन्न खाऊ नये. ते पचवणं कठीण जाते.
 • जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही आठवड्यातून एक दिवस पाणी आणि ज्यूस घेऊन उपवास करू शकता.
 • पाणी तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकेल आणि ज्यूस तुम्हाला ऊर्जा देईल.
 • उपवासानंतर संध्याकाळी जड अन्न खाऊ नका. सॅलड, फळे आणि काही हलके अन्न खा. यामुळे पचनक्रिया चांगली राहते.

विज्ञानानुसार उपवास कसा ठेवायचा हे तुम्ही जाणून घेतले. आता जाणून घ्या, शुगर आणि ब्लडप्रेशरच्या रुग्णांनी उपवास कसा करावा.
शुगर किंवा रक्तदाब असलेले रुग्ण 9-10 दिवस उपवास करू शकतात का?
उपवास करायचा की नाही हा तुमचा वैयक्तिक निर्णय आहे. अवनी कौल, न्यूट्रिशनिस्ट आणि डायबेटिक एज्युकेटर यांच्यानुसार– 9 ते 10 दिवस उपवास केल्यामुळे साखरेच्या रुग्णांना त्रास होऊ शकतो. ज्या लोकांची शुगर कंट्रोलमध्ये नाही, त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय इतके दिवस उपवास करू नये. त्याचप्रमाणे ज्यांना बीपीचा त्रास आहे, त्यांनीसुद्धा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय उपवास करू नये.

शुगर किंवा बीपी नियंत्रणात असल्यास 9-10 दिवस उपवास करता येईल का?
शुगर किंवा बीपी नियंत्रणात असले तरी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. त्यानंतर डाएट चार्टसह उपवासाचा पर्याय निवडू शकता.

शुगर किंवा बीपीच्या रुग्णांनी रमजानमध्ये उपवास करणे योग्य आहे का?
रमजानमध्ये उपवास करायचा की नाही, हासुद्धा प्रत्येक व्यक्तीचा वैयक्तिक निर्णय आहे. मधुमेह किंवा बीपीचे रुग्ण सावधगिरी बाळगून उपवास करू शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. रमजानच्या काळात, जेवणामध्ये 12 ते 15 तासांचे अंतर असते, त्यामुळे त्रास होऊ शकतो. साखर किंवा बीपीच्या रुग्णांना नियमित आणि वेळेवर अन्न खाण्याचा सल्ला दिला जातो.

मुंबईच्या हिंदुजा हॉस्पिटलच्या एंडोक्राइनोलॉजिस्ट सल्लागार डॉ. रोशनी संघानी सांगतात की, जर तुम्ही साखरेचे रुग्ण असाल आणि उपवास करण्याचा विचार करत असाल, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि ब्लड शुगर मीटर नक्कीच खरेदी करा. बीपीच्या रुग्णांनीही उपवास करण्यापूर्वी एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. सेहरी आणि इफ्तारमध्ये औषध घ्यायला विसरू नका.

शुगर किंवा ब्लडप्रेशरच्या रुग्णांनी औषध घेणे आवश्यक आहे का?
डॉ मोहम्मद रझा, MBBS-MD फिजिशियन यांच्या मते, जर एखाद्या रुग्णाला त्याच्या डॉक्टरांनी नियमित औषध घेण्याचा सल्ला दिला असेल तर त्याने ते घ्यावे. स्किप करू नये.

ऑफिसमधून सुटी मिळाली नाही तर रोजा कसा सोडावा?
डॉ. मोहम्मद रझा, एमबीबीएस-एमडी फिजिशियन यांच्या मते, तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही फक्त एका खजूरने रोजा सोडू शकता. नमाज घरी जाऊन वाचू शकता.

नवरात्रीचा डाएट प्लॅन
नाश्त्यासाठी काय करावे?

 • स्किम्ड दूध किंवा दूधही घेणे चांगले राहील.
 • फळे आणि भिजवलेले बदाम ऊर्जा देतात.

लंचमध्ये काय खावे

 • भाजीसोबत शिंगाड्याची पोळी खाऊ शकता.
 • रायता आणि सलाड पोटाला हलके ठेवेल.
 • भाजी आणि दह्यासोबत शाबूदाणा वडा बेस्ट राहील.

संध्याकाळी काय घ्यावे?

 • तुम्ही एक कप गरम ग्रीन टी पिऊ शकता.

रात्रीच्या जेवणात काय घ्यावे?

 • फळे आणि दूध घेऊ शकता.
 • भाजीसोबत भोपळ्याचे ज्यूस घेऊ शकता.
बातम्या आणखी आहेत...