आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

काेराेना विषाणू:मास्क तीन लेअरचा वापरावा,बाहेरून असला पाहिजे गडद रंग - डब्ल्यूएचओ वरिष्ठ संशाेधक

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मास्कसह परस्परांत एक मीटरचे अंतर राखा

डाॅ. प्राे. साैम्या स्वामीनाथन । प्रमुख वैज्ञानिक, डब्ल्यूएचओ
काेराेना विषाणूपासून संरक्षणासाठी लस येत नाही ताेपर्यंत मास्क हेच तुमची आमची खरी सुरक्षा आहे. म्हणूनच सध्याच्या परिस्थितीत मास्क सर्वांच्या जीवनासाठी सर्वात महत्त्वाचा आणि उपयुक्त मित्र आहे. त्यामुळेच याची साथ मुळीच साेडू नका. मास्क तुम्हाला संसर्गापासून वाचवताेच. किंबहुना तुमच्या संपर्कातील लाेकांचाही बचाव करताे. काेराेनाचा संसर्ग एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला ताेंड तसेच नाकाद्वारे बाहेर पडणाऱ्या ड्राॅपलेटने हाेताे. या ड्राॅपलेटपासून बचावाचे काम मास्क करू शकताे.

आराेग्य सेवा देणाऱ्या यंत्रणा, काेविड केअर सेंटर आणि फ्रंटलाइन वर्कर्स यांनी एन-९५ व एन-९९ मास्क घातले पाहिजे. कारण त्यांचा काेविड रुग्णांशी थेट संपर्क येताे. त्यातून त्यांना संसर्गाचा धाेका जास्त असताे. बाकी लाेकांसाठी घरी तयार केलेले कपड्यांचे मास्क किंवा थ्री लेअरचे सर्जिकल मास्क उपयाेगी ठरतात. थ्री लेअरच्या मास्कमध्ये पहिला लेअर तरल पदार्थांना राेखताे. मास्क घालताना आणि काढताना लहानसहान गाेष्टींकडे लक्ष दिले पाहिजे.

मास्कला हात लावण्यासाठी हातांना स्वच्छ पाण्याने धुतले पाहिजे. थ्री-लेअरच्या मास्कमध्ये जास्त गडद रंग बाह्य बाजूने असला पाहिजे. दाेन्ही बाजूने काही गॅप राहणार नाही, अशा रीतीने मास्क घातला पाहिजे. मास्कला वारंवार स्पर्श करणे टाळा. मास्क काढल्यानंतर काेणत्याही परिस्थितीत ताे पृष्ठभागावर ठेवू नका.

मास्कसह परस्परांत एक मीटरचे अंतर राखा
मास्क घातला पाहिजे. त्यासाेबतच परस्परांत एक मीटरचे अंतर राखणे अत्यंत गरजेचे आहे. त्याशिवाय गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. पार्टी, उत्सवापासून दूर राहा. कारण अशा ठिकाणी संसर्गाची भीती जास्त वाढते.