आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Lifestyle
  • Health
  • Men Hemoglobin Is Less Than 14, While Women's Is Less Than 12; Eat Fruits Like Orange pineapple, Exercise Too

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी नॉलेज सिरीज:पुरुषांचे हिमोग्लोबिन 14, तर महिलांचे 12 पेक्षा कमी असल्यास इम्युनिटी कमकुवत; संत्री-अननसासारखी फळे खा, व्यायामही करा

7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोमट पाण्यात लिंबाचा रस, सुक्या मेव्यात मनुके व खारका खाणे चांगले

कोरोनाकाळात बहुतांश लाेकांनी सर्वाधिक सर्च इम्युनिटी म्हणजे रोग प्रतिकारक्षमतेबाबत केला आहे. इम्युनिटीची पातळी किती आहे व ती कशी वाढवायची हे सर्वांनाच जाणून घ्यायचे आहे. यावर दै. भास्करच्या पवनकुमार यांनी तज्ज्ञांशी संवाद साधला. असे आहे तज्ज्ञांचे मत...

बाजारात अनेक इम्युनिटी बूस्टर, त्यांची सत्यता तपासणे अशक्य...खाण्यापिण्यावर लक्ष देणे हेच चांगले
इम्युनिटीचा अचूक अर्थ काय आहे?
मानवी शरीरात अनेक प्रकारचे विषाणू व जिवाणू असतात. काही शरीरासाठी लाभदायक, तर काही नुकसानकारक असतात. शरीरात जे घटक रोगप्रतिकारक्षमता विकसित करतात, विषाणूविरुद्ध लढण्याची शक्ती निर्माण करतात त्याला इम्युनिटी असे म्हटले जाते.

एखाद्याच्या इम्युनिटीची पातळी काय आहे हे जाणून घेण्यासाठी टेस्ट करता येते का?
होय. विविध आजारांविरुद्धची इम्युनिटी तपासण्यासाठी अनेक चाचण्या असतात. कोरोनाच्या बाबतीत आयजीजी अँटिबॉडी टेस्टने इम्युनिटी कळते. हिमोग्लोबिनच्या पातळीवरून इम्युनिटी कळू शकते. हिमोग्लोबिनची आदर्श पातळी पुरुषांत १६ व महिलांत १४ असते. पुरुषांत हिमोग्लोबिन १४ पेक्षा व महिलांत १२ पेक्षा कमी असल्यास रोगप्रतिकारक्षमता कमकुवत असल्याचे मानता येते.

एखाद्या व्यक्तीची इम्युनिटी काही दिवसांमध्येच वाढवली जाऊ शकते का?
हो. मात्र इम्युनिटी वाढवण्याची कृत्रिम पद्धत तात्पुरती असते. आैषधे व चांगल्या खाण्यापिण्यामुळे काही दिवसांतच इम्युनिटी वाढवली जाऊ शकते.

मुलांची इम्युनिटी जास्त असल्याचे म्हटले जाते हे खरे आहे का? असेल तर असे का होते?
मुलांना इम्युनिटी जास्त असते हे खरेच आहे. मात्र यामुळे मुलांना संसर्गच होणार नाही असे नसते. मुलांना अनेक प्रकारचे संसर्ग ‘रिसिव्ह’च होऊ शकत नाही. यामुळे ती बचावतात.

बाजारात खूप सारी उत्पादने इम्युनिटी बूस्टर म्हणून विकली जात आहेत, यात सत्यता आहे?
बाजारात मिळणारे काही प्रॉडक्ट्स फूड सप्लिमेंट म्हणून चांगले असतात. त्याने प्रत्यक्षात रोगप्रतिकारक्षमताही वाढते. मात्र त्याची सत्यता तपासणे अत्यंत गरजेचे आहे. पण ते प्रत्येक वेळी शक्य नाही. यामुळे इम्युनिटी वाढवण्यासाठी बाजरी, चणा व मूग डाळी, पालेभाज्या आणि दुधाचे सेवन करणे जास्त फायदेशीर असते. इम्युनिटी वाढवण्यासाठी केळ्यासह संत्री, अननस आदी फळे खाल्ली पाहिजेत. कोमट पाण्यासाेबत लिंबाचा रस पिणेही चांगले असते. लसणामुळेही रोगप्रतिकारक्षमता बऱ्यापैकी वाढते. सुक्या मेव्यात बदाम, मनुके आणि खारकांचे सेवन करणेही लाभदायक असते.

फक्त खाण्यापिण्यामुळे इम्युनिटी वाढते का?
फक्त खाण्यापिण्यामुळेच इम्युनिटीत सुधारणा होणार नाही. सकारात्मक विचार, नियमित व्यायाम, ७-८ तासांची गाढ झाेप घ्यावी. तणावही कमी करायला हवा. यासोबतच पौष्टिक आहाराने इम्युनिटीत सुधारणा होईल.

डॉ. तरुण साहनी
सीनियर कन्सल्टंट, इंटर्नल मेडिसिन, इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटल

बातम्या आणखी आहेत...