आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआपले चयापचय मंद झाल्यास त्याचा परिणाम शरीरात लठ्ठपणा, शारीरिक ऊर्जेचा अभाव यासह हार्मोनल बदलांच्या रूपात दिसून येतो. तथापि, छोटे बदल करून ते रिसेट करता येते. आज चयापचय रिसेट करण्याचे तीन मार्ग जाणून घेऊया.
चयापचयाबद्दल आपल्याला हे माहीत असणे आवश्यक अखेर चयापचय म्हणजे काय? शरीरात होणाऱ्या सर्व रासायनिक क्रियांना चयापचय म्हणतात. जॉन्स हॉपकिन्स मेडिसिनच्या मते, चयापचय श्वासोच्छ्वासापासून रक्त प्रवाह, ऊतींची दुरुस्ती, संप्रेरक संतुलन, पचन आणि निर्णय घेण्यापर्यंत सर्व गोष्टींवर परिणाम करते.
वयाबरोबर हे कमकुवत होते का? { चयापचय एक ते २० वर्षे वाढत जाणाऱ्या वयापर्यंत दरवर्षी सुमारे तीन टक्के या दराने मंदावत जाते. { पण २० ते ६० वर्षे वयापर्यंत त्याचा फारसा परिणाम होत नाही. यामध्ये सहसा दरवर्षी सुमारे ०.७% ची घट होते.
या तीन पद्धतींनी करता येतो मेटाबाॅलिझम रिसेट १. पाणी आणि मिनरल्स वाढवा पाणी व मिनरल्सच्या कमतरतेमुळे पेशी लवकर थकायला लागतात, त्यामुळे चयापचय कमकुवत होऊ लागते. आवश्यकतेनुसार पाणी व मिनरल्ससाठी अधिक हिरव्या व ताज्या भाज्यांचा वापर करा. २. कमी झोपेचा थेट परिणाम होतो आपण चांगली झोप घेतो तेव्हा शरीर स्वतःला बरे करते. ऊतींची दुरुस्ती होते. हार्मोन्स संतुलित असतात, त्यामुळे आहार आणि हालचाल चांगली होते. एकूणच आरोग्य सुधारण्याच्या दिशेने वाटचाल होते. ३. शरीराच्या गरजेनुसार पुरेसे अन्न खा वजन कमी करण्यासाठी कमी अन्न खाण्यास किंवा मर्यादित आहार घेण्यास सुरुवात करता तेव्हा चयापचय क्रिया तुमच्या नवीन आहारानुसार हृदय, यकृत, फुप्फुस यांसारख्या महत्त्वाच्या अवयवांच्या कार्याला अनुकूल बनवू लागते, त्यामुळे ते कमकुवत होऊ लागते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.