आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lifestyle
  • Health
  • Milk Drink | Marathi News | Divya Marathi | Should I Drink Milk Standing Or Sitting? This Is Exactly What The Experts Say; Find Out ...

दूधात असते पोटॉशियम:दूध उभे राहून प्यावे की खाली बसून? यामागे तज्ञांचे नेमके काय म्हणणे आहे; जाणून घ्या...

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दूध उभे राहून प्यावे की खाली बसून, यावरुन नेहमी वाद होत असतो. काहींच्या मते दूध खाली बसून पिणे योग्य आहे तर काहींच्या मते उभे राहून दूध पिणे योग्य आहे. त्यामुळे दूध उभे राहून प्यावे की खाली बसून, असा कॉमन प्रश्न प्रत्येकाच्या मनात असतो. यामागे तज्ञांचे नेहमे काय म्हणणे आहे? हे आपण जाणून घेऊया..

दूधाचे सेवन का करावे?

  • दूध प्यायची अनेक फायदे आहेत. दूधामध्ये असणारे कॅल्शियम दातांना आणि हाडांना मजबूत बनवते.
  • दूधामध्ये पोटॉशियम असल्याने ते हृदयासाठी चांगले असते.
  • दुधामध्ये असलेले व्हिटॅमिन डी अनैसर्गिक पेशींच्या वाढीस प्रतिबंध करते, ज्यामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो.
  • दूध पिण्याने सेरोटोनिन, आनंदाशी संबंधित हार्मोनचा स्राव उत्तेजित होतो, ज्यामुळे तणाव कमी होतो.
  • दूध प्यायल्याने शरीराला नैसर्गिक फॅट मिळते जे आरोग्यासाठी फायदेशीर असते, त्यामुळे शरीरातील नको असलेली चरबी वाढत नाही.

दूधाचे सेवन उभे राहून करावे की बसून?
डॉक्टरांच्या सल्लानुसार, दूधाचे सेवन उभे राहून केले पाहिजे. कारण दूधाचे सेवन बसून केल्याने दूध शरीराच्या अर्ध्याच भागात जाते. याउलट दूधाचे सेवन उभे राहून केल्याने, दूध संपूर्ण शरिरात पोहोचते. त्यामुळे शरीराच्या सर्व अवयवांना पोषक तत्वे मिळतात.

बसून दूध पिल्यावर काय होईल?
जेव्हा तुम्ही बसून दूध पितात तेव्हा या द्रवाचा प्रवाह रोखला जातो आणि तो अन्ननलिकेच्या खालच्या भागात राहतो त्याला सामान्यतः GERD असे म्हणतात.

जेव्हा बळजबरीने दूध प्यावे लागते...
कधी कधी अनेकांना आग्रहास्तव दूध प्यावे लागते किंवा बळजबरीने बसून दूध प्यावे लागते. त्यामूळे दूध पिताना तो तोंडावाटे पुन्हा बाहेर येणार नाही याची काळजी घ्या. लहान घुटके घ्या जेणेकरून तुमच्या पोटाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. असे केले तर पोटात देखील दुखणार नाही.

बातम्या आणखी आहेत...