आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य:जास्त पाणी म्हणजे जास्त कॅलरी खर्च होणे

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मानवाच्या शरीरात सुमारे ६५ टक्के पाणी असते. शरीरातील पाण्याचे संतुलन राखणे सर्वात महत्त्वाचे आहे. पाण्याचे प्रमाण विशिष्ट पातळीच्या खाली गेल्यावर व्यक्तीला तहान लागल्याची जाणीव होते.

जेवणाच्या आधी पाणी प्यायल्याने वजन कमी होते : नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या इम्युनोथेरपी एका संशोधनानुसार, खाण्यापूर्वी अर्धा तास आधी पाणी प्यायले गेले तर ते अन्नातून शरीरात जाणाऱ्या कॅलरींचे प्रमाण लक्षणीय प्रमाणात कमी करते. विशेषत: वृद्धांमध्ये त्याचा परिणाम अधिक दिसून येतो.

२ लिटर पाणी प्यायल्याने खर्च होते ९६ कॅलरी : पबमेड.ओजीव्हीच्या संशोधनानुसार, एका वेळी सुमारे ५०० मिली पाणी प्यायल्यास अस्थायी रूपात चयापचय २४-३० टक्क्यांपर्यत वाढू शकते. दिवसभरात सुमारे २ लिटर पाणी पिण्यामुळे प्रति दिन ९६ कॅलरी या हिशेबाने अतिरिक्त ऊर्जा खर्च होते.

बातम्या आणखी आहेत...