आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मैदानी खेळ:मुलांच्या स्क्रीन टाइमवर निसर्ग हा उपाय, रोज स्क्रीन टाइमइतका वेळ बाहेर खेळणे आवश्यक

औरंगाबाद15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्याची पिढी आणि मागील पिढीतील सर्वात मोठा फरक म्हणजे निसर्गाच्या सान्निध्यात घालवलेला वेळ. परिणामी मुले शारीरिकदृष्ट्या कमकुवत होत आहेत. त्यांच्या सामाजिक विकासावर परिणाम होत आहे. हार्वर्डच्या म्हणण्यानुसार, बाहेर कमी सक्रिय राहणारी मुले यशस्वी होण्याची शक्यता कमी असते. ३-५ वर्षांच्या मुलांनी दिवसभर सक्रिय असले पाहिजे. ६ ते १७ वयोगटातील मुलांनी दिवसातून ६० मिनिटे खेळले पाहिजे.

बाहेर खेळणे यासाठी आवश्यक आरोग्यासाठी यामुळे पंचेंद्रियांचा उत्तम विकास होतो मुले बाहेर खेळतात तेव्हा त्यांच्या दृष्टी, श्रवण, स्पर्श, गंध आणि चव या पाच ज्ञानेंद्रियांचा सर्वांगीण विकास होतो. ते अधिक कॅलरीज बर्न करतात, त्यामुळे लठ्ठपणाचा धोका कमी होतो. याशिवाय स्नायू आणि हाडे मजबूत होतात. व्हिटॅमिन डीचे उत्पादन पुरेसे होते, त्यामुळे गंभीर शारीरिक आणि मानसिक रोगांचा धोका कमी होतो.

यशासाठी शिकण्याची क्षमता व आत्मविश्वास वाढतो यशासाठी नियोजन, प्राधान्यक्रम ठरवणे, समस्या सोडवणे, वाटाघाटी आणि मल्टिटास्किंग आवश्यक आहे. मूल नैसर्गिक वातावरणात मित्रांसोबत खेळते तेव्हा ही कौशल्ये उत्तम प्रकारे विकसित होतात. ते फक्त शिकत नाही तर खेळताना ते वापरतेही. खेळादरम्यान त्याची जोखीम घेण्याची क्षमता वाढते, त्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढतो.

५ मिनिटे - जर्नल ऑफ पॉझिटिव्ह सायकॉलॉजीनुसार, पाच मिनिटेही निसर्गात घालवलीत तर सकारात्मक भावना वाढतात. २० मिनिटे - बर्मिंगहॅम येथील अलाबामा विद्यापीठाच्या मते, २० मिनिटे हिरव्यागार जागेत थांबणे किंवा व्यायाम केल्याने आनंद तर वाढतोच, पण एकूणच आरोग्यही सुधारते. १ तास - युनिव्हर्सिटी ऑफ कॉलेज लंडनने ८ ते ९ वर्षे वयोगटातील ४५० प्राथमिक शाळांतील मुलांचा दीर्घकालीन अभ्यास केला. संस्थेला आढळून आले की, मुलांचे मन, शरीर आणि भावनांच्या योग्य विकासासाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रत्येक मुलाने दररोज किमान एक तास निसर्गाच्या सान्निध्यात घालवणे आवश्यक आहे. हे उद्यान, होम गार्डन किंवा कोणत्याही हिरव्यागार जागेत करता येईल. ३ तास - पेडियाट्रिक ऑक्युपेशनल थेरपिस्ट अँजेला हॅन्सकॉम यांच्या मते, सध्या एक मूल दिवसातून सरासरी तीन तास स्क्रीनवर घालवते. अशा परिस्थितीत त्यांना नैसर्गिक वातावरणात वर्षभरात १००० तास म्हणजे दिवसाचे ३ तास खेळण्याची परवानगी दिली तर ते स्क्रीन टाइमचा प्रतिकार करू शकतात.

मुलांना खेळासाठी कसे प्रवृत्त करावे? {मुलांना बाहेर खेळण्यासाठी प्रोत्साहन देणारी उपकरणे किंवा खेळणी द्या. {त्यांना खेळासाठी सार्वजनिक उद्यान, मैदान किंवा नैसर्गिक वातावरणात घेऊन जा. {स्वतःला प्रेरित करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे सक्रिय जीवनशैली अंगीकारणे.

बातम्या आणखी आहेत...