आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोळे कोरडे पडणे हे देखील कोरोनाचे लक्षण:नवीन रिसर्चमध्ये दावा- कोरोनाने बाधित प्रत्येक 5 पैकी 1 व्यक्तीला कोरड्या डोळ्यांची समस्या

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाच्या लक्षणांमध्ये खोकला, सर्दी, ताप यांचा समावेश असला तरी आता डोळे कोरडे आणि अंधुक होणे यासुद्धा संसर्गाशी संबंधित समस्या सांगण्यात येत आहेत. अलीकडेच, हाँगकाँगच्या चायनीज युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी एका संशोधनात म्हटले आहे की, कोरोनाने ग्रस्त असलेल्या 20% लोकांचे डोळे कोरडे होत आहेत.

कोरोनापासून आता डोळेही सुरक्षित नाहीत

संशोधकांनी 1 ते 3 महिन्यांदरम्यान कोरोनामधून बरे झालेल्या 228 रुग्णांची तपासणी केली. या रुग्णांच्या आरोग्य नोंदींची तुलना 109 निरोगी लोकांशी करण्यात आली. असे आढळून आले की, कोरोनाची लागण झालेल्या प्रत्येक 5 पैकी 1 व्यक्तीमध्ये कोरड्या डोळ्यांच्या आजाराची लक्षणे आहेत. याव्यतिरिक्त, त्यांना डोळे अंधुक, प्रकाश संवेदनशीलता, आणि डोळे सूज देखील होऊ शकते.

कोरड्या डोळ्यांचा आजार म्हणजे काय?
कोरडे डोळे म्हणजे डोळ्यांत कोरडेपणा. जेव्हा तुमच्या डोळ्यांना पुरेसा ओलावा मिळत नाही, तेव्हा अश्रू तयार न होणे, जळजळ, सूज आणि डोळ्यांमध्ये वेदना यासारख्या समस्या उद्भवतात.

यापूर्वीही असे संशोधन झाले आहे
कोरोनाचा डोळ्यांशी काय संबंध आहे यावर २०२१ मध्ये संशोधन करण्यात आले आहे. प्रत्येक 10 कोरोना रुग्णांपैकी 1 रुग्ण डोळ्यांशी संबंधित समस्यांना सामोरे जात असल्याचे सांगण्यात आले. त्यातही डोळे कोरडे पडणे ही सर्वात मोठी समस्या दिसून आली.

कोरोना डोळ्यांवर कसा हल्ला करतो?

असे मानले जाते की डोळ्यांच्या आजाराचे कारण कोरोना आणि ACE2 एन्झाइममधील दुवा असू शकतो. ACE2 एन्झाइमच्या मदतीनेच कोरोना मानवी शरीरात प्रवेश करतो. यानंतर हा विषाणू आपल्या डोळ्यातील पेशींना संक्रमित करतो, ज्यामुळे डोळ्यांमध्ये समस्या निर्माण होतात.

कोरडे डोळे कसे टाळायचे?
संशोधकांनी सांगितले आहे की, कोरोनामुळे कोरड्या डोळ्यांची लक्षणे काही आठवड्यांत बरी होतात. जर यामुळे रुग्णाला खूप त्रास होत असेल तर डॉक्टरांशी संपर्क साधणे हा एक चांगला उपाय आहे. याशिवाय कोरड्या डोळ्यांपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही या घरगुती उपायांचा अवलंब करू शकता-

  • जोराचा वारा, धूर आणि डोळ्यांना थेट संपर्क टाळा.
  • पुरेसे पाणी प्यावे.
  • हवेतील आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी ह्युमिडिफायर वापरा.
  • डॉक्टरांना विचारून डोळ्यांचा व्यायाम करा.
बातम्या आणखी आहेत...