आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना व अँटिबॉडी:घटत्या प्रतिपिंडांबद्दल चिंता नको, गरजेनुसार शरीर ते पुन्हा तयार करू शकते

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 18 ते 24 वर्षे वयोगटातील तरुणांमध्ये अँटिबॉडीजची सर्वात कमी घट

कोरोनातून बरे झाल्यानंतर शरीर त्याविरुद्ध प्रतिपिंडे बनवते. परंतु ती किती काळ प्रभावी राहतात, हा प्रश्न कायम आहे. सुरुवातीच्या संशोधनात दिसून आले की काही काळानंतर प्रतिपिंडे कमी होऊ लागतात. आता शास्त्रज्ञांनी म्हटले आहे की घटत्या अँटिबॉडीजमुळे घाबरून जाण्याची गरज नाही. अँटिबॉडीज कमी होतात, कारण शरीराला त्वरित त्यांची आवश्यकता नसते. रोग प्रतिकार पेशी विषाणूला ओळखतात, त्यामुळे आवश्यकतेनुसार प्रतिपिंडे पुन्हा विकसित केली जाऊ शकतात. नव्या संशोधनात काय आहे, Q&A द्वारे जाणून घ्या

शरीरातील प्रतिपिंडे चार ते सात महिने स्थिर राहतात
Q. इंग्लंडमध्ये कोरोना प्रतिपिंडे (शोधण्यायोग्य) असलेल्या लोकांचे प्रमाण गेल्या ३ महिन्यांत २७% कमी झाले, रोग प्रतिकारशक्ती कमी काळ टिकते का?
A.
अनेक तज्ज्ञ म्हणतात की, संसर्गमुक्त झाल्यानंतर शरीरात प्रतिपिंडे कमी होणे खूप सामान्य आहे. या रोगप्रतिकारक पेशी विषाणू स्मृतीत ठेवतात आणि आवश्यकतेनुसार ताजे प्रतिपिंडे तयार करतात. पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातील इम्युनोलॉजिस्ट डॉ. स्कॉट हेन्स्ली म्हणतात, संसर्गमुक्त झाल्यानंतर शरीरात अँटिबॉडीज नसणे म्हणजे त्या व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती चांगली काम करत आहे. बराच काळ अँटिबॉडीज नसणे म्हणजे त्यांची संरक्षण व्यवस्था कमकुवत झाली असा होत नाही.

Q. प्रतिकारक प्रणालीचे मूल्यांकन करण्यासाठी प्रतिपिंडे मदत करू शकतात? शरीरातील प्रतिपिंडे किती काळ प्रभावी असतात?
A.
व्यक्तिविशेषानुसार तयार झालेल्या अँटिबॉडीजवरील अनेक अभ्यास सांगतात की, सुरुवातीला घटल्यानंतर प्रतिपिंडांची पातळी कमीत कमी चार ते सात महिने स्थिर राहते. लंडनच्या इम्पीरियल कॉलेजमधील एपिडेमिओलॉजिस्ट डॉ. पॉल इलियट सांगतात, फक्त अँटिबॉडीज रोग प्रतिकारशक्तीबद्दल सांगत नाहीत. अँटिबॉडीज रोगप्रतिकारक शक्तीचा फक्त एक भाग आहे, जे आपण मोजू शकतो.

Q. अँटिबॉडीज घटण्याच सर्वाधिक प्रभाव कुणावर?
A.
२० जून ते २८ सप्टेंबर या काळात ब्रिटनमधील साडेतीन लाख लोकांवर अँटिबॉडीच्या तीन चाचण्या घेण्यात आल्या. तीन महिन्यांत या लोकांमध्ये शोधण्यायोग्य अँटिबॉडीजची पातळी ६ टक्क्यांवरून ४.८% पर्यंत राहिली. अँटिबॉडीजची सर्वात कमी घट १८ ते २४ वर्षे वयोगटातील लोकांमध्ये, तर सर्वाधिक उणीव ७५ वर्षांवरील लोकांमध्ये दिसून आली.

बातम्या आणखी आहेत...