आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:आता सांधेदुखीपासून सुटका, स्टेम सेलपासून कार्टिलेज तयार करण्यात यश, यामुळे लंगड्या उंदराचा पायही बरा

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • उतरत्या वयातील एक दुर्धर आजार बरा होण्याची अपेक्षा वाढली

गिना काेलाटा
उतरत्या वयात सांधेदुखी हा आजार सर्वत्र दिसून येतो. सांध्याच्या जोडात गादीप्रमाणे काम करणारे कार्टिलेज संपल्याने सांधे एकमेकांना घासरले जातात आणि ऑस्टियो आर्थरायटिससारखे दुखणे वाढते. आतापर्यंत एकदा आर्टिलेज घासले गेले अथवा नष्ट झाले तर ते पुन्हा तयार होणे अशक्य आहे असे मानले जात होते. परंतु आता स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी नुकत्याच केलेल्या संशोधनामुळे मोठी आशा निर्माण झाली आहे. ‘नेचर मेडिसिन’मध्ये प्रकाशित या संशोधनानुसार, शास्त्रज्ञांनी आर्थरायटिस या आजाराने ग्रासलेल्या उंदराच्या सांध्याच्या जोडात नवे कीर्टिलेज विकसित करण्यात यश मिळवले आहे. यासाठी स्टेम सेलचा वापर करण्यात आला. त्या हाडाच्या कोनात निष्क्रिय रूपात होत्या. शास्त्रज्ञांनी त्यांना जागृत केले आणि विकसित करण्यासाठी प्रेरित केले.

शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, नवे संशोधन गुडघ्यावर आर्थरायटिस झालेल्या उंदरावर करण्यात आले. मानवी हाडे प्रत्यारोपित करण्यात आलेल्या उंदरावरही हा प्रयोग करण्यात आला. दोन्ही अवस्थेत सामान्य कार्टिलेज विकसित झाले. पहिला उंदीर योग्यरीत्या चालू शकत नव्हता. कार्टिलेज विकसित झाल्यानंतर त्याचे लंगडणे कमी झाले. संशोधकांनी सांगितले, आता त्यांनी मोठ्या प्राण्यांत असे कार्टिलेज विकसित करण्याचे ठरवले आहे.

त्यांचे निष्कर्ष मनुष्याच्या आर्थरायटिसवरील उपचार करण्याचा मार्ग सोपा करतील. ज्ञात असेल की, जागतिक आरोग्य संघटनेनुसार, ६० वर्षांवरील ९.६% पुरुष व १८% महिलांना ऑस्टियोआर्थरायटिस असते. भारतात दरवर्षी १.५ कोटी वयस्कर व्यक्तींना ऑस्टिओआर्थरायटिस असतो.

महिलांना सर्वाधिक त्रास, प्रारंभीच उपचार होणे शक्य
२०१८ मध्ये स्टॅनफोर्ड विद्यापीठातील चार्ल्स वॉक फई चान यांनी सुप्त स्टेम सेलचा शोध लावला होता. त्यात कार्टिलेज विकसित होऊ शकत होते. ते जागृत कसे होतील हा एक प्रश्नच होता. ताज्या संशोधनाचे प्रमुख डॉ. मायकल लोंगाकर यांनी तीन टप्पे शोधले. मनुष्याच्या सुरुवातीच्या आजारातच यावर उपचार होऊ शकतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.