आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lifestyle
  • Health
  • Omicron And Flu | Marathi News | Flu 1918 And Corona 2020 |  American Researcher Claims Omicron Wave Like The Flu Epidemic In 1918, Even At That Time Mask And Lockdown Were Necessary

इतिहासाची पुनरावृत्ती:1918 मध्ये आलेल्या 'फ्लू'प्रमाणेच आहे ओमायक्रॉन; त्याकाळी देखील मास्क आणि लॉकडाऊनसारखी स्थिती निर्माण झाली होती

8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. भारतात देखील रोजच कोरोना रुग्णांचा उच्चांक पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात देशात पुन्हा 1.68 लाख रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. वाढती रुग्णसंख्या आता पुन्हा एकदा चिंतेचा विषय ठरत आहे. जगभरात गेल्या दोन वर्षापासून हाहाकार माजवणारा कोरोना हा आजार 1918 मध्ये आलेल्या 'फ्लू' महामारी या सारखाच असल्याचे बोलले जात आहे.

काही दशकांपुर्वी देखील नागरिक मास्क घालुनच घरातून बाहेर निघत होते, आणि आता सुद्धा तीच परिस्थिती जगासमोर आली आहे. अमेरिकेच्या ओरॅगन स्टेट युनिव्हर्सिटीचे संशोधक क्रिस्टोफर मैकनाइट निकोल्स यांनी सांगितल्या माहितीनुसार, 1918 मध्ये आलेल्या फ्लूने देखील सुरुवातीलाच तरुण आणि निरोगी लोकांवर हल्ला केला होता.

1918 मध्ये देखील दाखवला होता निष्काळजीपणा

द वॉशिंग्टन पोस्टमध्ये प्रकाशित एका लेखात निकोल्स यांनी लिहले आहे की, पहिल्या विश्वयुद्धानंतर फेब्रुवारी 1918 मध्ये फ्लू हा विषाणू सर्वात आधी अमेरिकेत आढळला होता. त्यानंतर हळूहळू हा फ्लू संपुर्ण जगात पसरला गेला. फ्लूचा प्रसार देखील हवेवाटे होत असे, त्यामुळे अवघ्या सहाच महिन्यात हा विषाणू अमेरिकेतून संपुर्ण जगात पसरला होता. मात्र यात ओमायक्रॉनच्या तुलनेत मृत्यू खुपच कमी होते.

पहिल्या महायुद्धामुळे 1918 मध्ये आलेला फ्लू अमेरिकेपासून संपूर्ण जगात पसरला होता.
पहिल्या महायुद्धामुळे 1918 मध्ये आलेला फ्लू अमेरिकेपासून संपूर्ण जगात पसरला होता.

फ्लूचे काही लक्षणे देखील ओमायक्रॉन सारखीच होती. त्यात ताप आणि सर्दी होत असे. तरीही देखील लोकांनी त्याला हलक्यात घेतले आणि तीन दिवस चालणारा हा तापच असल्याचे म्हटले होते. निकोल्सच्या माहितीप्रमाणे ऑक्टोबर 1918 मध्ये फ्लूचा सर्वात खरतनाक व्हेरिएंट समोर आला होता. त्यामुळे अमेरिकेत अवघ्या एका महिन्यात दोन लाख जणांचा मृत्यू झाला होता. मात्र कालातरांने 1919 येताच फ्लूचे रुग्ण सापडणे आणि मृत्यू देखील कमी झाले. जगभरात फ्लूमुळे पाच कोटी जणांचा मृत्यू झाला आहे.

जगभरातील फ्लू महामारीमुळे एकूण 50 दशलक्ष लोक मरण पावले.
जगभरातील फ्लू महामारीमुळे एकूण 50 दशलक्ष लोक मरण पावले.

1918 मध्ये देखील लॉकडाऊनसारखी स्थिती

फ्लूला लोकांनी हलक्यात घेतल्यानंतर याचा संपुर्ण जगात वेगाने पसार झाला होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात परिस्थिती हाताबाहेर गेली होती. कारण या विषाणूमुळे अनेकांचे डोळ्यासमोर मृत्यू होत होते. त्यामुळे लॉकडाऊनसारखी स्थिती निर्माण झाली होती. सरकारने चित्रपटगृहे, स्वीमींग पूल आणि सर्व सार्वजनिक ठिकाणे बंद करण्याचा निर्णय घेतला होता. लोकांना घरातून निघताना मास्क लावणे देखील बंधनकारक करण्यात आले होते. तसेच मास्क न घालणाऱ्यांना जेलमध्ये देखील टाकण्यात येत होते. तसेच जर एखाद्याला फ्लूची लागण झाली तर, त्याला आयसोलेशल आणि सोशल डिस्टेंसिंगचे देखील पालन करावे लागायचे.

1918 मध्येही लोकांना घराबाहेर निघताना मास्क घालणे बंधनकारक होते
1918 मध्येही लोकांना घराबाहेर निघताना मास्क घालणे बंधनकारक होते

खूप वर्षांपूर्वी वैज्ञानिंकानी लस तयार करण्याचे केले होते प्रयत्न

निकोल्सचे म्हणणे आहे की, 1918 मध्येच वैज्ञानिंकानी फ्लूची लस तयार करण्याचे प्रयत्न केले होते. मात्र त्यात वैज्ञानिंकाना फारसे यश मिळाले नाही. त्यामुळे सध्या तरी आपल्याकडे कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी कोरोनाच्या अनेक लसी आहेत. त्याचे वापर आपण करायला हवेत.

ज्याप्रमाणे फ्लूचा विषाणू अजूनही वातावरणात आहे, त्याचप्रमाणे कोरोनाचा विषाणू देखील संपणार नाही
ज्याप्रमाणे फ्लूचा विषाणू अजूनही वातावरणात आहे, त्याचप्रमाणे कोरोनाचा विषाणू देखील संपणार नाही

फ्लू प्रमाणेच कोरोना कधीच संपणार नाही

निकोल्सचे म्हणणे आहे की, ज्याप्रकारे 1918 मध्ये जन्मलेल्या फ्लूचे रुग्ण अजूनही सापडते. त्यामुळे कोरोना देखील जगातून कधीच हद्दपार होणार नाही, मात्र कोरोना फ्लू सारखाच एक साधारण विषाणू होऊन जाईल.

बातम्या आणखी आहेत...