आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lifestyle
  • Health
  • Omicron | Corona | Marathi News | What Symptoms Differentiate Omicron From A Cold? When Should The Corona Test Be Done? Know Expert Opinion

कोरोना v/s सर्दी-खोकला:ओमायक्रॉनचे लक्षणं सर्दी-खोकला प्रमाणेच! कसे ओळखायचे कोरोना की ओमायक्रॉन? जाणून घेऊया

नवी दिल्ली20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुम्हाला सर्दी, घसा खवखवणे, मळमळ आणि अंगदुखी जाणवत आहे का? जर असे असेल तर, तुम्हाला सर्दी किंवा कोरोना या दोघांपैकी एक असू शकतो. जगभरातील अनेक डॉक्टरांचे असे म्हणणे आहे की, कोरोनाचा नवीन विषाणू ओमायक्रॉनचे लक्षण सर्दी-खोकला प्रमाणेच आहे.

त्यामुळे या दोघात नेमका फरक काय आहे हे समजणे अतिशय कठीण आहे. मात्र लसीकरण आणि पूर्वीच्या संसर्गामुळे ही लक्षणे गंभीर होत नाहीत. असे तज्ञांचे मत आहेत. त्यामुळे आपल्याला नेमका कोरोना झाला की, सर्दी-खोकला आता हे कसे ओळखायचे? जाणून घेऊया

ही चार लक्षणं कोरोनाचे
महामारीचे विशेषज्ञ डॉ. अब्दुल अल-सईद यांनी सांगितले की, कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनचे आणि सर्दीचे लक्षणे सुरुवातीला काही प्रमाणात सारखीच असतात. मात्र काही काळानंतर या दोघांत आपल्याला बदल पाहायला मिळू शकतो. कोरोना झाल्यावर डोकेदुखीसोबतच कोरडा खोकला देखील येतो. चव आणि वास न येणे हे देखील कोरोनाचे लक्षणे आहेत. डॉ. अल-सईदचे म्हणणे आहे की, जर तुम्हाला खोकला येत असेल तसेच त्याबरोबर अंगदुखी आणि ताप असेल, तर तात्काळ कोरोनाची चाचणी करुन घ्यावी.

तात्काळ विलगीकरणात जावे

कोरोनाच्या सौम्य लक्षणांमुळे तुम्हाला संसर्गाची जाणीव होऊ शकत नाही, मात्र तुम्ही कोणाला भेटले, कधी भेटले त्यातील कोणाला कोरोना झाला तर नाही ना? याची नीट काळजी घ्यायला हवी. जर आपल्याला वाटते की आपण कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलो आहोत, तर तात्काळ स्वत:ला विलगीकरणात ठेवावे. त्यामुळे दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीला कोरोनाची लागण होणार नाही.

कोरोना टेस्ट कधी करावी?

जर तुम्हाला कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवत असतील तर, तुम्ही तात्काळ कोरोनाची चाचणी करुन घ्यायला हवी. जर तुम्ही एखाद्या कोरोना रुग्णाच्या संपर्कात आला असाल तरी देखील आपण सावधानी म्हणून, कोरोनाची चाचणी करुन घ्यावी.

बातम्या आणखी आहेत...