आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lifestyle
  • Health
  • Omicron | Marathi News | If You Want To Avoid Omicron, Then It Is Necessary To Wear Two Masks, They Will Give 91% Protection; Learn The Right Way To Use Them From WHO

डबल मास्क आहे जरुरी:ओमायक्रॉनपासून लढण्यासाठी दोन मास्क हाच सर्वोत्तम उपाय, त्यामुळे 91 टक्क्यांपर्यंत मिळते सुरक्षा; WHO ने सांगितले मास्क घालण्याचे फायदे

5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने अनेक देशात कोरोनाची तिसरी लाट आणली आहे. अशातच हाँगकाँगच्या वैज्ञानिकांनी एक मोठा खुलासा केला आहे. जर ओमायक्रॉनपासून जर आपल्याला लांब राहायचे असेल तर, आपल्याला दोन मास्क घालावे लागतील. असे खुलासा हाँगकाँगच्या वैज्ञानिकांनी केला आहे. विशेष म्हणजे कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांनी दोन मास्क घालणे बंधनकारक असल्याचे देखील वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. दोन मास्क लावल्याने आपल्याने आपण 91 टक्के कोरोनापासून सुरक्षित राहू असे देखील तज्ञांचे म्हणणे आहे.

हायरिस्कवर डबल मास्क अत्यंत आवश्यक

मायक्रोबायोलॉजिस्ट यूएन क्वोक-युंगच्या म्हणण्यानुसार, ज्यांना पहिल्यापासून काही आजार असतील, त्यांनी दोन मास्क घालणे आवश्यक आहेत. सोबतच कोरोनाची लस न घेतलेले, डॉक्टर्स आणि विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी देखील डबल मास्क परिधान करावे. चायनीज युनिव्हर्सिटी ऑफ हाँगकाँगच्यचे प्रोफेसर डेविड हुइ यांच्यानुसार, मास्क लावल्याने तोंडाच्या दोन्ही बाजूंनी काही प्रमाणात मोकळी जागा रिकामी असते, त्यामुळे संक्रमणचा धोका वाढतो. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी, कंटेटमेंट झोन, रुग्णालय तसेच गर्दीच्या ठिकाणी दोन मास्क घालणे आवश्यक आहे.

मास्क किती प्रकारचे असतात

प्रामुख्याने मास्क हे तीन प्रकारचे असतात. एक सर्जिकल मास्क, दुसरा N95 मास्क आणि तिसरा कपड्याचा मास्क. N95 मास्कला कोरोनापासून बचाव होण्यासाठी सर्वाधिक सुरक्षित असल्याचे मानले जाते. कारण हा मास्क तोंड आणि नाकावर घट्ट बसते. त्यामुळे बारीक- सारीक कण देखील तोंडात किंवा नाकात जात नाहीत. तर सामान्य सर्जिकल मास्क हा 85 टक्के कणांना रोखण्यास मदत करते. तर कपड्याचा मास्क हा 30 ते 60 टक्के सुरक्षित असल्याचे मानले जाते.

कोणते दोन मास्क एकसोबत घालावे

अमेरिकी हेल्थ एजेंसी सेंटर्स फॉर डिसज कंट्रोल अॅण्ड प्रीवेंशननुसार, सर्जिकल मास्कवर कपड्याचा मास्क वापरणे सोयिस्कर आहे. कारण कपड्याचे मास्क घातल्यानंतर सर्जिकल मास्क चौहूबाजूंनी झाकल्या जाते. जर आपण N95 मास्क वापरत असाल तर आपल्याला कोणत्याही प्रकारचे दोन मास्क घालण्याची गरज नाही. कारण हा एकटा मास्क कोरोनाला हरवण्यास सक्षम आहे.

मास्क वापरण्याची पद्धत

  • मास्कला हात लावण्यापूर्वी आपले हात साबणाने स्वच्छ धुवा किंवा सॅनिटायझरचे वापर करा.
  • मास्क असे घाला की तुमचे नाक, तोंड पुर्णपणे झाकल्या गेले असेल.
  • एकदा मास्क घातल्यानंतर त्याला पुन्हा-पुन्हा हात लावू नये. तर हात लावत असाल तर तात्काळ हात धुऊन घ्यावे.
  • मास्कला नेहमी मागुन धरा.
  • सिंगल मास्क घालत असाल, तर त्याला एकदाच घाला. जर दुसरा मास्क घालत असाल तर त्याला धुऊन वापरा.

मास्कला डिस्पोज कसे करावे

केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मास्कला नेहमी फेकताना त्याचे छोटे-छोटे तुकडे करुन घ्यावे. फेकण्यापुर्वी या छोट्या-छोट्या तुकड्यांना 72 तास आधी पेपर बॅगमध्ये ठेवा. त्यामुळे मास्कवाटे संक्रमणाचा धोका कमी होतो.

बातम्या आणखी आहेत...