आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजगभरात ओमायक्रॉन हा विषाणू वेगाने पसरत आहे. या विषाणूच्या विळख्यात सापडलेल्या रुग्णांना वेगवेगळ्या प्रकारची लक्षणे आढळत आहेत. डॉक्टरांचे असे म्हणणे आहे की, कोरोनाच्या प्रमुख लक्षणांव्यतिरिक्त काही अशी लक्षणे असतात, जी आढळले की तात्काळ कोरोनाची चाचणी करुन घ्यायला हवी.
अमेरिका सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अॅण्ड प्रिवेंशनने नुकतेच एक चेतावनी दिली आहे. त्यात असे सांगण्यात आले आहे की, त्वचा, नखे आणि ओठांचे रंग बदलणे हे देखील ओमायक्रॉनचे लक्षणे असू शकतात. आरोग्य एजेन्सीनुसार असे लक्षणे आढळल्यास तात्काळ कोरोनाची चाचणी करुन घ्यायला हवी.
या लक्षणांपासून सतर्क राहा
CDC नुसार, ओमायक्रॉन संक्रमित रुग्णांमध्ये अनेक प्रकारचे लक्षणे पाहायला मिळतात. या विषाणूचा एक नवीन लक्षण, त्वचा, नखे आणि ओठांचे रंग बदलले हे देखील आहेत. CDC ने चेतावनी दिली आहे की, त्वचा, नखे आणि ओठांचे पिवळे किंवा निळे पडणे ही लक्षणे रक्तात कमी ऑक्सिजन असल्याची सुचना देते. कारण कोरोना झाल्यानंतर रक्तात ऑक्सिजन कमी होतो. अशात जर तुम्हाला असे लक्षणे आढळत असेल, तर तात्काळ कोरोनाची चाचणी करुन घ्यावी. कारण अशी लक्षणे आढळल्यास काही दिवसानंतर तुम्हाला श्वास घेण्यास देखील त्रास होऊ शकतो. अंगदुखी, झोप न येणे हे देखील ओमायक्रॉनचे लक्षणे असू शकतात.
ओमायक्रॉनचे प्रमुख लक्षणे
CDC नुसार, शरिरात विषाणूचा शिरकाव झाल्यानंतर दोन किंवा 14 दिवसांच्यानंतर काही लक्षणे जाणवतात. नंतर ही लक्षणे सौम्य देखील असू शकतात. जसे की सर्दी, खोकला, खाज, ताप, श्वास घेण्यास त्रास होणे, अंगदुखी, डोकेदुखी, तोंड कडू पडणे हे देखील कोरोनाची प्रमुख लक्षणे असू शकतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.