• Home
  • Lifestyle
  • Health
  • Parenting Guide : make Lock down interesting for Kids; Teach something new online; Engage them in different activities and routine works

पॅरेंटिंग गाइड : लॉकडाउन मुलांसाठी बनवावे रंजक; ऑनलाइन काहीतरी नवीन शिकवावे; वेगवेगळ्या अ‍ॅक्टिव्हिटी आणि दैनंदिन कामांमध्ये व्यस्त ठेवावे

  • मुलांना शांत करण्यासाठी काम (Calm) आणि ब्रीद (Breathe) यांसारख्या अ‍ॅप्सचा वापरही करू शकता 

  • त्यांना पोळ्या बनवणे, टेबल सेट करणे, रोपांना पाणी घालणे, कपड्यांच्या घड्या घालणे यांसारख्या गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करा

दिव्य मराठी वेब टीम

Mar 26,2020 01:24:00 PM IST

मानसी जवेरी


एका आठवड्यापेक्षा जास्त होत आला आहे. आपण अजूनही घरात बंद आहोत आणि कुटुंबात सर्वजण अगोदरच त्रस्त आहेत. हा काळ कठीण नक्कीच आहे. कोरोना व्हायरसमुळे आपल्यापैकी कुणीही आउटिंग किंवा वीकेंडसाठी बाहेर जाऊ शकत नाही. ही निश्चितपणे आव्हानात्मक वेळ आहे आणि अशात पेरेंट्सला सल्ले हवे आहेत की, त्यांनी कशाप्रकारे आपल्या मुलांना घरात गुंतवून ठेवावे आणि खुश ठेवावे. एक आई म्हणून मी माझ्या घरात हलके फुलके आणि आंनदी वातावरण बनवून ठेवण्यासाठी काही नियम बनवले आहेत. आपण सर्वांनी मान्य केले पाहिजे की, आपण ही वेळ आपल्या मुलांसोबतचे नाते आणखी चांगले घट्ट बनवण्यासाठी वापरू शकतो.


योजना बनवा...


भलेही तुम्ही घरातच का सेने. प्रत्येक गोष्टीचे प्लॅनिंग कारणे गरजेचे आहे. ऑफिससाठी असो किंवा किचनसाठी. मला प्रत्येक गोष्ट प्लॅन करण्याची सवय आहे. मुलांसाठी तर मी सुनिश्चितपणे एका रात्रीआधीच योजना बनवते जेणेकरून, मला माहित असावे की, दुसऱ्या दिवशी मी त्यांना कोणत्या अ‍ॅक्टिव्हिटीमध्ये व्यस्त ठेवणार आहे आणि त्यासाठी कोणकोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत. म्हणजे जेव्हा मी आपले काम करत असें. तेव्हा मुले मला त्रास देणार नाहीत. असे केल्यानेही तुम्ही सुनिश्चित करू शकता की, येणारे दिवस मुलांसाठी मजेशीर बनवाल.


त्यांना दैनंदिन कामे शिकवावी....


यावेळी मुलांना आपली दैनंदिन कामे शिकवावेत कारण हे मुलगा आणि मुलगी दोघांसाठी खूप गरजेचे आहे. हे कौशल्य आयुष्यात कधी ना कधी सर्वांनाच कामी येते. यावेळी तुम्ही मुलांना हेदेखील शिकवू शकता की, असे कोणतेही काम नाही जे केवळ मुलींसाठी आहे आणि केवळ मुलांसाठी आहे. हीच ती वेळ आहे जेव्हा मुले हे सर्व शिकत आहे. त्यांना पोळ्या बनवणे, टेबल सेट करणे, रोपांना पाणी घालणे आणि कपड्यांच्या घड्या घालणे यांसारखी कामे शिकवण्याचे प्रयत्न करावेत.


शाळा बंद, पण शिकबने अजूनही सुरु...


शाळा बंद झाल्याचा अर्थ हा नाही की, मुले आता काहीही शिकू शकत नाहीत. असे अनेक यूट्यूब चॅनल आहेत, जसे - चॅनल मम, टूनीआर्क्स, चूच टीव्ही इत्यादी. एआर अ‍ॅप्स जसे की, स्पेसवॉर अपरायजिंग, किडोपिया इत्यादी आणि लर्निंग वेबसाइट्स जसे- किड्सवेबइंडिया, चंदामामा, स्टारफॉल इत्यादी, ज्यांद्वारे तुम्ही तुमच्या मुलांना अनेक कोर्स लावू शकता. याची काळजी घ्यावी अशा वेळेत त्यांच्या काही नवीन शिकण्याचे नुकसान होऊ नये.


मुलांना ‘काउच पोटॅटो’ बनण्यापासून वाचावा...


अनेक इंटरेस्टिंग अ‍ॅनिमल फ्लो योगासने आहेत जी मुलांना व्यायामासोबतच त्यांना फिट राहण्यासाठीही मदत करू शकतील. आपल्या दिवसाची सुरुवात मुलांसोबत एक्सरसाइजने कराल तर उत्तम राहील. लक्षात ठेवा तुम्ही आता जे मुलांना शिकवाल. ती त्यांची सवय बनू शकते. तुम्ही मुलांना शांत करण्यासाठी काम (Calm) आणि ब्रीद (Breathe) यांसारखे अ‍ॅप्सदेखील वापरू शकता.

X