आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पॉवर ऑफ पॉझिटिव्हिटी:सकारात्मक विचाराने आपली प्रतिकारशक्तीही मजबूत होते

10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तीस वर्षांतील ३००हून अधिक संशोधनांच्या आकडेवारीतून (मेटा-डेटा) सिद्ध झाले आहे की, आयुष्यातील तणावाच्या घटना शरीराच्या रोगप्रतिकारशक्तीवर परिणाम घडवतात. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये या मेटा डेटाचे विश्लेषण प्रकाशित करण्यात आले आहे.

१. तणावाचा शरीरावर किती परिणाम होईल, हे त्याचा प्रकार व कालावधीवरून निश्चित होते. उदा. भाषण देण्याआधीही एक प्रकारचा स्ट्रेस असतो, तर परीक्षेच्या भीतीसारखे काही नैसर्गिक तणावही असतात.

२. मग येतो गंभीर तणाव. हा आजाराचा, नाते तुटण्याचा किंवा नोकरी जाण्याच्या भीतीचाही असू शकतो. यात आपले परिस्थितीवर नियंत्रण राहिले नाही, असे एखाद्याला वाटत राहते. यामध्ये अंतस्रावाची यंत्रणा सक्रिय होते. म्हणजे कोर्टिकोस्टराइड हार्मोन पाझरू लागतात. तणावामुळे शरीराच्या अन्य कार्यप्रणालीवर विपरीत परिणाम होतो, हे जगभरात दिसून आले आहे.

३. तणाव चांगला नाही, यावर विज्ञानाने आधीच शिक्कामोर्तब केले आहे. पण, यात सकारात्मक विचाराचे काय योगदान आहे? संशोधकांनी प्रतिकारशक्तीचा अभ्यास करण्याआधी लोकांमधील तणावाचा अभ्यास केला. आयुष्य तणावपूर्ण असल्याचे मानणारे व नकारात्मक विचारांवर अधिक लक्ष केंद्रित करणाऱ्यांच्या शरीरात नैसर्गिक मारक पेशींची संख्या कमी होत जाते. विषाणू व संसर्गबाधित पेशींना नष्ट करणे, हे या मारक पेशींचे काम असते.

. तणावाबाबत एखाद्याचा दृष्टिकोन मोठ्या प्रमाणात काही गोष्टींमुळे ठरतो, हे अभ्यासातून समोर आले. जेव्हा लोकांना थोडासा कमकुवतपणा जाणवू लागतो किंवा ते तणावग्रस्त होतात आणि जेव्हा सामूहिक रुपात कोट्यवधी पेशी एकत्र तयार होतात, तेव्हा रोगप्रतिकार प्रणालीही एका बाजूला उभी राहून आपल्या प्रतिक्रियेची प्रतीक्षा करत असते.

. प्रत्येक वाईट बातमीत काही ना काही चांगली गोष्ट दडलेली असते. वास्तविक सगळा तणाव स्वतःशी जोडलेला असतो आणि आपल्या रोगप्रतिकार प्रणालीने काय ऐकावे, यासाठी आपणच जबाबदार असतो. आपल्या रोगप्रतिकार प्रणालीच्या रेणूंना कुठल्या दिशेने न्यायचे, हे आपल्यावर अवलंबून आहे. मनाला चांगले वाटून घेण्यामुळे शरीरही चांगली प्रतिक्रिया देते. स्वतःशी बोलण्याची आणि सकारात्मक विचारांनी आपली रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्याची ही वेळ आहे.

बातम्या आणखी आहेत...