आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासायन्स डेलीनुसार, शरीरात होणारे बदल वेळीच ओळखले गेले तर कॅन्सर वेळेत ओळखता येतो. शरीरात आढळणारी ही ४ चिन्हे अशा धोक्यांकडे निर्देश करतात.
थकवा तुम्हाला खूप थकवा येत असेल आणि विश्रांती घेऊनही तो कमी होत नसेल तर हे ब्लड कॅन्सरचे लक्षण असू शकते. प्रोस्टेट कर्करोगाच्या प्रगत अवस्थेतही खूप थकवा येतो.
ताप वारंवार आणि बहुतांश वेळा रात्रीच्या वेळी ताप, घाम येत असेल आणि संसर्गाची इतर कोणतीही चिन्हे दिसत नसतील, तर हे कर्करोगाचे लक्षण असू शकते.
वेदना कर्करोगामुळे आपल्याला होणारा त्रास शरीरात कायम राहतो. वेदना शरीरात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पसरते तेव्हा सावध राहा. कर्करोगाच्या प्रसारामुळे असे होऊ शकते.
वजन तुमच्या नियमित दिनचर्येत बदल न करता तुमचे वजन ५ किलो किंवा त्याहून अधिक कमी झाल्यास सावध व्हा. स्वादुपिंड, पोट, फुप््फुसाच्या कर्करोगात वजन झपाट्याने कमी होते.
कर्करोगाशी संघर्षाचे जिवंत चित्र ही आहे न्यूयॉर्कची २४ वर्षीय आहुती सुखाडिया. कॅन्सर उपचारात केमोथेरपीमुळे केस गळू लागल्यावर दु:ख न मानता त मुंडण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यात जवळच्या मित्रांना बोलावले. या धाडसाच्या जोरावर ती आता कॅन्सरमुक्त झाली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.