आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (सीडीसी) च्या म्हणण्यानुसार, सिगारेटच्या धुरात ७ हजार प्रकारची रसायने आढळतात. ही रसायने हार्ट अॅटॅक, स्ट्रोक, कॅन्सरसह अनेक मोठ्या व असाध्य आजारांचे कारण ठरतात आणि आपल्या शरीराच्या अनेक अवयवांवर परिणाम करतात. सर्वात जास्त परिणाम आपल्या फुप्फुसांवर होतो, म्हणून फुप्फुसांच्या कर्करोगामुळे होणाऱ्या १० पैकी ९ मृत्यूंमागे धूम्रपानाची सवय हे कारण असते. याच्या धोक्यापासून वाचण्याचा एकच उपाय आहे ः धूम्रपान सोडणे. हार्ट फाउंडेशननुसार व्यक्तीने सिगारेट सोडल्यास दुसऱ्यांदा हार्ट अॅटॅक येण्याचा धोका ५०% पर्यंत कमी होतो. सिगारेट सोडण्याचे ३ मोठे फायदे आपल्या शरीरावर स्पष्टपणे दिसू शकतात. याशिवाय सिगारेट सोडण्याचा ३ डी फाॅर्म्युला प्रभावी मानला जातो.
सिगारेट सोडल्याने होणारे फायदे
हृदय : हृदयगती सामान्य होते
सिगारेट ओढल्यावर हृदयगती आणि रक्तदाब दोन्हीही वाढतात. २ तासांनी ते सामान्य होऊ शकते. सिगारेट सोडल्यावर एका दिवसातच कोरोनरी डिसीज आणि हार्ट अॅटॅकचा धोेेका कमी होऊ लागतो. सिगारेट सोडल्यावर १५ वर्षांनी हृदय सामान्य व्यक्तीप्रमाणे होते.
फुप्फुसे : श्वासोच्छ्वास दीर्घ व स्थिर होतो
सिगारेट सोडल्यावर २ ते ३ आठवड्यांनी फुप्फुसांची क्षमता वाढते. काही महिन्यांनी खोकला व श्वास घेण्यास होणारा त्रास कमी होऊ लागतो. धूम्रपान सोडल्यावर १० वर्षांनी फुप्फुसांच्या कर्करोगाचा धोका अर्धा होतो.
तोंड : चव ओळखण्याची क्षमता वाढते
सिगारेट सोडल्यावर सुमारे ४८ तासांनी वास घेणे व चव ओळखण्याची क्षमता वाढू लागते. दातांचा पिवळेपणा घटू लागतो.
३. डी फॉर्म्युला
1. डिले म्हणजे टाळणे संशोधनानुसार सिगारेट ओढण्याची तलफ ३ ते ५ मिनिटांत संपते. पहिल्या दिवशी जास्त तलफ येते. म्हणून तलफ आल्यावर ५ ते ७ मिनिटे ती टाळा.
2. डिस्ट्रॅक्ट म्हणजे लक्ष दुसरीकडे वळवणे
सिगारेट ओढण्याच्या विचारांवरून लक्ष दुसरीकडे वळवा. फिरायला जा किंवा शब्दकोडे सोडवा. लक्ष दुसरीकडे वळवल्याने सिगारेट ओढण्याचे डोक्यात येणारे विचार दूर करता येऊ शकतात.
3. ड्रिंक वॉटर - पाणी प्या
सिगारेटची तलफ रोखण्यासाठी पाणी प्या. पाणी मानसिक व शारीरिक आरोग्य सुधारते. धूम्रपान सोडण्याच्या काळात पाणी शरीराला हायड्रेट ठेवून नकारात्मक प्रभाव कमी करते.
डॉ. संदीप मेहता
डायरेक्टर, सर्जिकल ऑन्कोलॉजी, एचओडी ऑन्को रिकन्स्ट्रशन फोर्टिस हॉस्पिटल, नवी दिल्ली
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.