आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मान्सून आला, आजारांनाही सोबत घेऊन आला:कोरोना दरम्यान बदललेल्या हवामानामुळे डेंग्यूपासून फंगसपर्यंतचा धोका वाढला; घातक ठरू शकतात हे रोग, जाणून घ्या त्यांची लक्षणे आणिबचावण्याचे उपाय

4 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • पावसात होणारे आजार आणि त्यापासून बचाव करण्याचे मार्ग जाणून घेऊयात...

पावसाळ्यात अनेक साथींच्या आजारांनाही निमंत्रण असते. पावसामुळे बर्‍याच ठिकाणी पाणी साचणे आणि घाण यामुळे डास आणि धोकादायक बॅक्टेरिया जन्म घेतात. पाणी आणि हवेद्वारे हे विषाणू आपल्या अन्नापर्यंत आणि नंतर त्या माध्यमातून आपल्या शरीरात शिरकाव करतात. यामुळे आपण ताप, फ्लू सारख्या आजारांना बळी पडतो.

पावसामुळे घरांमध्ये ओलसरपणाची समस्या निर्माण होते. घरांमध्ये वाढलेली आर्द्रता ब्लॅक फंगसचा धोका वाढवते. ब्लॅक फंगस पावसाच्या आर्द्रतेत झपाट्याने पसरतो.

भोपाळचे सुप्रसिद्ध हेमॅटोलॉजिस्ट डॉ. व्ही. के भारद्वाज म्हणतात की, कोरोना काळात थोडी खबरदारी घेतली गेली तर या आजारांपासून आपला बचाव होऊ शकतो. चला तर मग पावसात होणारे आजार आणि त्यापासून बचाव करण्याचे मार्ग जाणून घेऊयात...

 • सामान्य ताप आणि सर्दी

डॉक्टर भारद्वाज म्हणतात की, व्हायरल हा वातावरणाच्या बदलाबरोबर येणा-या जंतूमुळे होणारा ताप होतो. तो हवा आणि पाण्यातून पसरतो. सामान्य तापाचा प्रकार व्हायरसच्या प्रकारावर अवलंबून असतो.

तापासोबतच काही लोकांना खोकला आणि सांधेदुखीचा त्रास देखील होऊ शकतो, परंतु हा फ्लू, डेंग्यू किंवा चिकनगुनिया नाही. हा ताप तीन ते सात दिवस राहू शकतो. त्याचा कालावधी व्हायरसवर अवलंबून असतो.

हा आजार टाळण्याचे मार्ग

 1. जेवणापुर्वी हात धुवा
 2. शिळे अन्न खाऊ नका
 3. ताजी फळे खा
 4. पावसात भिजू नका
 5. अधिक काळ ओले कपडे घालू नका
 6. बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळा
 7. गर्दीपासून दूर राहा
 8. मास्क नक्की लावा
 • डासांच्या चाव्यामुळे होणारे आजार

चिकनगुनिया आणि डेंग्यू

डॉ. भारद्वाज सांगतात की, चिकनगुनिया आणि डेंग्यू हे विषाणूंमुळे होणारे आजार आहेत, परंतु ते वेक्टर बॉर्न डिसीज आहेत, जे डासांच्या चाव्यामुळे होते.

यामध्ये, सांधेदुखीसह तीव्र ताप येतो. यासह उलट्या आणि डोकेदुखीचा त्रास जाणवू लागतो.

डेंग्यूची सुरूवात तीव्र तापाने होते. डोकेदुखी आणि डोळ्यांच्या मागे वेदना. तसेच, प्लेटलेट कमी झाल्यामुळे शरीरावर पुरळ उठतात.

चिकनगुनियामध्ये, सांधेदुखी जास्त तीव्र असते, पहिल्या दोन किंवा तीन दिवसांत खूप ताप येतो.

डेंग्यूची लक्षणे

 • डोकेदुखी
 • थकवा
 • सांधेदुखी
 • तीव्र ताप
 • प्लेटलेट्स कमी होणे

हा आजार टाळण्याचे मार्ग

 1. घर स्वच्छ ठेवा, कूलर, खड्डे, कुंड्या आणि टायर्स इत्यादींमध्ये जास्त काळ पाणी साचू देऊ नका. त्यांच्यामध्ये डास पैदास करण्यास सुरुवात करतात.
 2. पूर्ण बाही असलेले कपडे घाला. हे विशेषतः मुलांसाठी लक्षात ठेवा.

मलेरिया
तीव्र डोकेदुखीसह थंडी वाजून ताप येणे ही मलेरियाची लक्षणे आहेत. हा ताप ठराविक अंतराने येत असतो. अशावेळी मलेरियाच्या निदानासाठी त्वरित रक्त तपासणी करा.

मलेरिया हा मादी एनाफिलीज या डासांमुळे होतो. त्यांच्या चाव्याव्दारे आपल्या शरीराच्या आत मलेरियाचे जंतू जातात. 14 दिवस तीव्र ताप येतो. हे डास पावसाच्या जमा असलेल्या पाण्यात पैदास करतात.

ही असू शकतात मलेरियाची लक्षणे

 • थंडी वाजून ताप येणे
 • डोकेदुखी
 • उलट्या होणे

हा आजार टाळण्याचे मार्ग

 1. मलेरियापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी मच्छरदाणी किंवा डाळ पळवणा-या छोट्या मशीन किंवा क्रीम इत्यादींचा वापर करावा.
 2. पाणी साचणार नाही याची काळजी घ्या.
 3. जर पाणी कुठे साचत असेल तर त्यात कीटकनाशक किंवा रॉकेल घालावे.

हिपेटायटिस ए

पावसाळ्यात हा आजार होण्याची शक्यता वाढते. कावीळ झाल्यास हिपेटायटिस ए होऊ शकतो. हे यकृताच्या पेशींमध्ये संक्रमणामुळे होते. या रोगाचे सूक्ष्मजंतू दूषित खाद्यपदार्थाद्वारे किंवा उकळलेले, फिल्टर न केलेले पाणी पिल्यामुळे शरीरात प्रवेश करतात. यामुळे रक्तातील बिलरुबिनचे प्रमाण वाढते. यामुळे शरीराचे भाग पिवळे दिसतात आणि कावीळ होतो.

हिपेटायटिस एची ही लक्षणे असू शकतात

 • सौम्य ताप
 • भूक न लागणे
 • थकवा जाणवणे
 • सतत झोप येणे
 • नखे आणि डोळे पिवळे पडणे

हा आजार टाळण्याचे मार्ग

 1. फक्त स्वच्छ वस्तू खा.
 2. पाणी उकळून किंवा फक्त फिल्टर केलेले पाणी प्या.
 3. बाहेरचे पदार्थ खाऊ नका.
 4. सार्वजनिक वॉशरूम सेफ्टीसह वापरा.

फ्लू (इन्फ्लूएन्झा)

पावसाळ्यात बहुतेक इन्फ्लूएन्झा फ्लूचे रुग्ण आढळतात. यामुळे सर्दी, खोकला, तीव्र ताप आणि सांधेदुखीचा त्रास होतो. ही लक्षणे सामान्य फ्लूची देखील असू शकतात. सामान्य फ्लू पाच ते सात दिवस राहतो. औषध घेतल्यानंतरही बरे होण्यासाठी बराच काळ लागतो. सर्दी आणि खोकला बरा होण्यासही 10 ते 15 दिवस लागतात.

फ्लू (इन्फ्लूएन्झा)ची ही लक्षणे असू शकतात

 • सर्दी
 • खोकला
 • ताप
 • सांधेदुखी

हा आजार टाळण्याचे मार्ग

डॉ. भारद्वाज म्हणतात की, फ्लू पासून बचावासाठी लस दिली जाऊ शकते. हे रोग दरवर्षी येतात, म्हणून लस घेऊन आपण हे आजार टाळू शकता. लस घेतल्यानंतरही फ्लू झाल्यास त्याचा परिणाम कमी होतो.

याशिवाय तुम्ही गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळू शकता. अशा ठिकाणी आजारी व्यक्तीच्या खोकला किंवा शिंकण्यामुळे इतर लोकांना संसर्ग होऊ शकतो.

फ्लूही स्पर्शातून पसरतो. जसे एखाद्या व्यक्तीने शिंका येत असताना स्वतःच्या चेह-यावर हात ठेवला आणि मग त्याच हाताने दुसर्‍यास स्पर्श केला, तर हा आजार पसरू शकतो. हे टाळण्यासाठी मास्त घालूनच गर्दीच्या ठिकाणी जावे

टायफॉइड

पावसाळ्यात टायफॉइडची प्रकरणे वाढतात. हा आजार साल्मोनेला टायफी बॅक्टेरियामुळे होतो. घाणेरडे पाणी पिल्याने किंवा घाणेरडे पदार्थ खाल्याने किंवा एखाद्या संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने टायफॉइड होऊ शकतो.

टायफॉइडची ही असू शकतात लक्षणे

 • डोकेदुखी
 • अंगदुखी
 • ताप
 • भूक न लागणे
 • बद्धकोष्ठता
 • अतिसार

हा आजार टाळण्याचे मार्ग

 1. उकळलेले पाणी, फक्त फिल्टर केलेले पाणी प्या.
 2. बाहेरचे खाऊ नका.
 3. अन्नपदार्थ झाकून ठेवा.
 4. एका दिवसात 3 ते 4 लिटर पाणी प्या.
 5. आहारात फळांचा रस, नारळपाणी, सूप यासारख्या गोष्टींचा समावेश करा.

फंगस

फंगस हवेत असते. आपण ब्रेड वर बुरशीच्या रुपात आणि झाडाच्या खोडांवर काळ्या स्वरूपात हे बघू शकतो. ही बुरशी आपल्या नाकातून त्वचेत जाते. यानंतर, हा रोग खूप वेगाने पसरतो, शरीरातील भाग नष्ट करु लागतो. ही बुरशी मेंदूतही जाते. यात मृत्यूचा दर 50 टक्के आहे.

फंगसपासून बचाव करण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

 1. सकाळ-संध्याकाळ जेवणानंतर गुळण्या करा.
 2. अन्नपदार्थ झाकून ठेवा
 3. बाहेरचे पदार्थ खाऊ नका
 4. थंडे पदार्थ खाऊ नका
 5. अँटीफंगल माऊथ फ्रेशचा वापर करुन तोंडाची स्वच्छता राखा
 6. तळलेले पदार्थ खाऊ नका
 7. ब्रश आणि टंग क्लिनरला नियमितपणे अँटीसेप्टिक माऊथवॉशने स्वच्छ करा.
बातम्या आणखी आहेत...