आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संशोधन:पुस्तक वाचन आणि भेटीगाठींमुळे चांगली राहते स्मरणशक्ती

छत्रपती संभाजीनगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाढत्या वयानुसार आपली स्मरणशक्ती कमी होणे हे सामान्य आहे, परंतु काही लोकांची स्मृती वेगाने कमी होते, त्यामुळे त्यांना स्मृतिभ्रंश होण्याचा धोका वाढतो. २००९-२०१९ या काळात चीनमधील २९ हजार लोकांवर केलेल्या संशोधनात असे आढळून आले की, आपण पुस्तके नियमितपणे वाचली, शरीर व मन दोन्हींसाठी व्यायाम केला आणि धूम्रपान केले नाही तर स्मरणशक्तीची ही कमतरता टाळता येऊ शकते. काही प्रकरणांत ते उलटही करता येते.

चांगल्या स्मृतीच्या पद्धती }सामाजिक भेटीगाठी : आठवड्यातून दोन दिवस लोकांशी भेटीगाठी घेतल्या तर स्मरणशक्ती चांगली राहते. यामुळे तणाव कमी होतो. नैराश्याशी लढण्यास मदत होते. }मानसिक उपक्रम : पुस्तके वाचणे हीदेखील एक चांगली मानसिक क्रिया आहे. आठवड्यातून दोन दिवसही पुस्तके वाचली किंवा सुडोकू किंवा कोडी सोडवण्यासारखे इतर मानसिक काम केले तर स्मरणशक्ती चांगली राहते. }आहार : फळे, भाज्या, दुग्धजन्य पदार्थ, मीठ, तेल, अंडी, तृणधान्ये, कडधान्ये, काजू, चहा, मासे आणि मांस या १२ पैकी ७ पदार्थांचा आहारात समावेश केल्यास स्मरणशक्ती चांगली राहते.